नगरसेवक जेवण कुठे वाटतात माहीत नाही! पी उत्तरच्या सीडीओचे धक्कादायक उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:22 AM2020-05-12T03:22:21+5:302020-05-12T03:23:01+5:30

मालवणी हा मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा वोटबँक असलेला विभाग आहे. मात्र आजही लाखो लोक अन्नासाठी तसेच मुस्लीम बांधव रोजा साहित्यासाठी ऐन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीदरम्यान वंचित आहेत.

we don't know where Corporators Distributed Food ! The shocking answer of the CDO of P North | नगरसेवक जेवण कुठे वाटतात माहीत नाही! पी उत्तरच्या सीडीओचे धक्कादायक उत्तर 

नगरसेवक जेवण कुठे वाटतात माहीत नाही! पी उत्तरच्या सीडीओचे धक्कादायक उत्तर 

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर  
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून पुरविले जाणारे जेवण नगरसेवकांमार्फत गरजूंपर्यंत वाटले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नगरसेवक हे जेवण नेमके वाटतात कुठे? याबाबत काही माहीत नाही, असे धक्कादायक उत्तर पी उत्तर विभागाच्या समाज विकास अधिकाºयाने (पीओडी) दिल्याने हीच बाब आज लाखो लोकांच्या उपासमारीसाठी कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.

मालवणी हा मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा वोटबँक असलेला विभाग आहे. मात्र आजही लाखो लोक अन्नासाठी तसेच मुस्लीम बांधव रोजा साहित्यासाठी ऐन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीदरम्यान वंचित आहेत. पी उत्तरचे पीओडी महेंद्र गभने यांनी पत्रकाराला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नगरसेवकांना अन्न आणि पैसे पुरवतो. त्यानंतर त्याचे वाटप करण्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवकाची आहे, कारण आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानुसार एखाद्याला जेवण किंवा साहित्य मिळत नसेल तर त्याला स्थानिक नगरसेवकच कारणीभूत असेल. त्यामुळे नगरसेवकाकडे याबाबत विचारणा करावी, असे ते म्हणाले. मात्र जेवणाचे वाटप नेमके कुठे होतेय, असा प्रश्न विचारल्यावर त्याबाबत काहीच माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावरून अन्नवाटपाच्या या उपक्रमाचा कोणी वालीच नसल्याचे उघड झाले आहे. अन्नपुरवठा करूनही गरिबांवर उपाशी मरण्याची वेळ येत असेल तर याबाबत संबंधित नगरसेवकाला अधिकाऱ्यांनी जाब विचारणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नगरसेविका फिरकल्याच नाहीत!
पालिकेकडून अन्नपुरवठा केला जाणार असल्याची बातमी मला समजली. त्यानंतर नगरसेवकांमार्फत ते वाटप केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अन्नवाटप सोडा, पण साधी विचारपूस करण्यासाठीही कोणी आलेले नाही.
मी मालवणीत राहत असून कमरजहाँ सिद्धीकी या आमच्या विभागाच्या नगरसेविका आहेत. मात्र अन्नवाटप करणे दूर, त्यांना आमच्या परिसरात फिरकतानाही मी पाहिले नसल्याचे या विभागात राहणाºया नामांकित वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. हीच परिस्थिती सर्व विभागांची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जेवणासाठी स्वयंपाक्याची नियुक्ती!
पालिकेकडून मालवणीत नगरसेविका कमरजहाँ सिद्धीकी यांच्याकडे जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकी नियुक्त करून देण्यात आला आहे. त्यानुसार सकाळ, सायंकाळ तीन हजार लोकांचे जेवण आणि अडीच हजार लोकांना दोन वेळच्या रोजासाठीचे खाद्य त्यांच्या वॉर्डमध्ये बनवून त्या वाटत असल्याचे गभने म्हणाले.

अन्नवाटप ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर? : पालिका असो वा नगरसेवक, जेवण जरी गरजूंपर्यंत पोहोचत नसले तरी त्याचे फोटो मात्र नित्यनेमाने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’वर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे हे जेवण प्रत्यक्षात नसले तरी सोशल मीडियावर वाटण्याचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी त्यातून निश्चितच गरिबाच्या पोटाची खळगी भरली जाईल याची दखल घेणे गरजेचे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

Web Title: we don't know where Corporators Distributed Food ! The shocking answer of the CDO of P North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.