Join us

राष्ट्रवादीचं ठरलंय; महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राष्ट्रीय नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:16 PM

राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसने 52 जागांवर विजय मिळविला केला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मिळालेले बहुमत पाहता महायुतीच सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे. तर, या निवडणुकीत जोरदार मुसंडी माराणारा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर बसणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले,"मी सांगू इच्छितो की, आम्ही विरोधी पक्षात असणार आहोत आणि सक्षम विरोधी पक्षांची भूमिका निभावणार आहेत. आम्हाला सरकार स्थापनेत कोणतीही भूमिका घ्यायची नाही, भाजप-शिवसेनेला हा कौल मिळाला आहे, म्हणून त्यांना शुभेच्छा." 

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळाले आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगले यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडणुकीतील झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादीने अर्धशतक पार करत 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनेही 44 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच विधानसभेतील विरोधी पक्षनेता होणार हे स्पष्ट आहे.  

टॅग्स :प्रफुल्ल पटेलमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र