विद्याधरचे ‘लोकेशन’ कळले

By admin | Published: December 30, 2015 01:15 AM2015-12-30T01:15:46+5:302015-12-30T01:15:46+5:30

हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरिश भांबानी यांच्या कांदिवली येथे झालेल्या दुहेरी खुनातील प्रमुख आरोपी विद्याधरला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास एका वरिष्ठ

We found out the location of Vidyadhar | विद्याधरचे ‘लोकेशन’ कळले

विद्याधरचे ‘लोकेशन’ कळले

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरिश भांबानी यांच्या कांदिवली येथे झालेल्या दुहेरी खुनातील प्रमुख आरोपी विद्याधरला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी व्यक्त केला. पोलिसांना चकवा देत असलेल्या विद्याधरचे लोकेशन मिळविण्यात यश आले असून, तो शेजारी राज्यात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
फरार असल्यापासून प्रथमच विद्याधरने रविवारी एका आर्टिस्टशी संपर्क साधला असून, त्याआधारे आता तपास सुरू आहे अशी ठोस माहिती प्रथमच मिळाली आहे. आमचे पथक विद्याधरला लवकरच अटक करेल, असा विश्वासही एका आयपीएस अधिकाऱ्याने व्यक्त केला. चौकशीत चिंतनला जेंव्हा थेट प्रश्न विचारण्यात येतात तेंव्हा तो त्याचे उत्तरे
देत नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेमा आणि हरिश भांबानी
यांना ज्या क्लोरोफॉर्मचा वापर
करून मारले तो क्लोरोफॉर्म पुरविण्यासाठी चिंतनने मदत केली होती. आमच्याकडे त्याचे पुरावे
आहेत. अर्थात हा क्लोरोफॉर्म
मुंबई वा महाराष्ट्रातून नव्हे, तर अन्य राज्यातून मागविण्यात आला होता, अशी माहितीही एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, चिंतनसोबतच्या बैठकीत नेमके काय झाले? चिंतनने काय सांगितले होेते? याबाबत चौकशीत आरोपी प्रदीप राजभरने काही सांगितले नाही.
विद्याधरला अटक झाल्यानंतर चिंतन आणि विद्याधरची समोरासमोर चौकशी करण्यासाठी चिंतनची कोठडी वाढवून घेणार आहात काय, असा प्रश्न केला असता या अधिकाऱ्याने सांगितले की, पर्याप्त पुराव्याअभावी चिंतनला जामिनाची शक्यता नाकारता येत नाही. विद्याधरची भूमिका ही पुराव्यांची पुष्टी करण्याइतपतच असू शकते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Web Title: We found out the location of Vidyadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.