Join us

Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:26 AM

Rohit Pawar : गेल्या काही दिवसापासून 'राष्ट्रवादी शरद पवारचंद्र' पक्षात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू होती. आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती.

Rohit Pawar ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचा वर्धापन दिन सोहळा झाला. यावेळी पक्षात अंतर्गत वाद असल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली, तर दुसरीकडे जयंत पाटील यांनीही नाव न घेता रोहित पवार यांच्यावर पलटवार केला. या वादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्याबाबत एक सूचक विधान केले आहे. 

राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर

लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षातील कार्यकर्त्यांनी पुण्यात सेनापती म्हणून जयंत पाटलांचे बॅनर्स लावले. या बॅनर्सवरुन जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात टोलेबाजी सुरू झाली. "हे यश कुणा एका सेनापतीचं नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचा टोला रोहित पवार यांनी हाणला. तर जयंत पाटलांनीही आपल्या भाषणातच रोहित पवारांना कानपिचक्या देत जाहीरपणे तक्रारी न मांडण्याचा खोचक सल्ला दिला.

यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. जयंत पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली, तर काही ठिकाणी पत्रांचे बॅनर लावण्यात आले. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्याबाबत एक सूचक वक्तव्य केले आहे. 

'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात असे अनेक अनुभवी नेते

"येत्या काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यामध्ये पवार साहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेत. ते निर्णय घेतात. महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षातीत बघायचं झाल्यास, आमच्या पक्षात खूप अनुभवी नेते आहेत. आमच्या पक्षात सर्वात जास्त अनुभवी नेता आज कोणास असेल तर जयंत पाटील साहेब आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून पाच ते सात वर्ष पद सांभाळले आहे. ते नक्कीच सक्षम पद्धतीने काम करु शकतात, असं सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

'त्यांच्याच बरोबर अनिल देशमुख आहेत.तसेच आव्हाड साहेब, टोपे साहेब आहेत. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात असे अनेक अनुभवी नेते आहेत.   जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला संधी मिळाल्यास शरद पवार यांच्यातील नेते निवडतील, असंही रोहित पवार म्हणाले. 

" जर पवार साहेबांनी ठरवले तर महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्री होऊ शकते. त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा लोकांच्या हिताची कामे करुन लोकांना केंद्रबिंदु करावे लागेल, असंही रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :रोहित पवारजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस