"एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले"; शरद पवारांकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:30 PM2023-08-09T12:30:30+5:302023-08-09T12:55:56+5:30

हरी नरके यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले, असे शरद पवार यांनी म्हटले.

"We have lost a fiery scholarly personality"; Condolences from Sharad Pawar on hari narke | "एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले"; शरद पवारांकडून शोक व्यक्त

"एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले"; शरद पवारांकडून शोक व्यक्त

googlenewsNext

मुंबई - ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे दुःखद निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी येत असताना आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी शोक व्यक्त करत हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली.

 

हरी नरके यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली, अशी माहितीही पवार यांनी दिली.

दरम्यान, हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं काम उल्लेखनीय राहिले. पुण्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भांडारकर प्राथमिक विद्या संस्थेवरही त्यांचं काम उल्लेखनीय होतं. मराठी भाषा ही संस्कृत कन्नड तेलुगु यांच्याप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून नरके यांनी योगदान दिले आहे. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक प्रखरपणे त्यांनी मांडली होती.. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा 1000 पानाचा ग्रंथ अध्यायावत करून प्रकाशित केला. त्याचे संपादक हरी नरके होते.

दरम्यान आज सकाळी ते पुण्याहून मुंबईला जात असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना गाडीत उलट्या झाल्या.. त्यानंतर त्यांना तातडीने एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले.. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली..

Web Title: "We have lost a fiery scholarly personality"; Condolences from Sharad Pawar on hari narke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.