आमचंही सतरावं संपलं...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 08:10 AM2017-12-31T08:10:50+5:302017-12-31T08:11:26+5:30

सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने वेगाला आणि वेळेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा घड्याळाच्या काट्यावर आयुष्याची गणिते मांडत असतो. त्यातच चुकून एखादा सेकंद चुकला आणि अपयश आले तर अनेक जण निराशेच्या गर्तेत अडकले जातात.

 We have lost seventeen ... | आमचंही सतरावं संपलं...  

आमचंही सतरावं संपलं...  

Next

मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने वेगाला आणि वेळेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा घड्याळाच्या काट्यावर आयुष्याची गणिते मांडत असतो. त्यातच चुकून एखादा सेकंद चुकला आणि अपयश आले तर अनेक जण निराशेच्या गर्तेत अडकले जातात. हे टाळण्यासाठी आहे त्या परिस्थितीत आनंदात राहा, लहान गोष्टींतून आनंद शोधा, असा सल्ला ज्येष्ठांनी नवीन वर्षानिमित्त तरुणांना दिला आहे.
गेल्या काही वर्षांत समाजात अनेक बदल झाले आहेत. आजची तरुण पिढी बदलत्या वातावरणात मोठी झाली आहे, तर ज्येष्ठ नागरिक एका वेगळ्या वातावरणात मोठे झाले आहेत. त्यामुळे अनेकदा तरुणाई ‘तुम्हाला नाही कळणार’ असे ज्येष्ठांना सांगते, पण ज्येष्ठांचा अनुभव तरुणांना नक्कीच एक मार्ग, दिशा देऊ शकतो.
आयुष्यात प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही सारखी नसते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत आनंदात राहायला शिकले पाहिजे. जशी आयुष्यात परिस्थिती आहे त्याच्याशी जुळवून घ्यायला हवे. त्यातही आपण नेहमीच नीट राहणे शिकले पाहिजे. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तुमच्या मनाप्रमाणे नसला तरी तो नीट, व्यवस्थित कसा जाईल याचा विचार तुम्ही करायला हवा. चढ-उतार आले तरी डगमगून न जाता, ठामपणे उभे राहा, असे अरविंद जोशी यांनी सांगितले.

प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले, काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. तरुण बदलत असतोच, पण त्यांनी ज्येष्ठांनाही या बदलांची ओळख करून दिली पाहिजे. ज्येष्ठांकडे अनुभव असतात, ते अनेकदा तरुणांना सांगतात. पण या वेळी तरुणांनी नवीन शिकायची संधी मिळते या दृष्टीने हे अनुभव ऐकणे आवश्यक आहे. अनेकदा तरुण पिढी अपयशाचा सामना करू शकत नाही. ते एकाकी राहतात. काहीच करत नाहीत. तरुणांनी असे कधीच करू नये. तुम्ही नेहमीच सक्रिय राहिले पाहिजे.

रंगनाथ इलग यांच्या म्हणण्यानुसार, तरुण पिढी हुशार आहे. अनेक ठिकाणांहून त्यांना सहज ज्ञान मिळते. विज्ञाननिष्ठ असल्याने या पिढीला अनेक प्रश्न पडतात. पण या सगळ्यात तरुण युक्तिवाद करतात. प्रत्येक वेळी प्रश्न विचारतात. ही बाब काही ठिकाणी चांगली आहे. पण नेहमीच असे झाल्यास यामुळे त्यांचाच त्रास वाढतो. काही वेळा यातून नात्यांमध्ये ताण निर्माण होतो, त्यामुळे फक्त योग्य ठिकाणी प्रश्न विचारले पाहिजेत. स्वत:वर नियंत्रण आणण्यासाठी योगाभ्यास नक्कीच उपयोगी पडतो.

विजय औंधे यांनी सांगितले, आयुष्यात कधीही अपयश आले तरी माणसाने धीर सोडायचा नाही. अपयशाने खचून न जाता त्यामागची कारणे शोधणे आवश्यक आहे. एकट्याने अपयशाचा सामना करण्यापेक्षा दुसºयांची मदत घ्या. त्यामुळे त्या परिस्थितीकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन मिळतो. तसेच, यश मिळाल्यावरही हुरळून जाता कामा नये. कारण, यश टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करा. तसेच, पुढे काय करता येईल याचा नक्कीच विचार करा. कोण मदत करेल, कोण नाही हे ओळखायला शिका. मित्र आणि गुरू यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

Web Title:  We have lost seventeen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.