Join us

शिवसेनेला पाठिंबा देणार का?, राष्ट्रवादीच्या उत्तरातून 'सस्पेन्स' कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:20 AM

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. अद्याप आमचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे, आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही पटेल यांनी म्हटले आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भाजपाचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री नको, म्हणणारे पक्ष योग्य निर्णय घेतील, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला हजर राहण्यास आलेले प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची भूमिका सांगितली.  

''बदलत्या राजकीय परिस्थितीत कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षासोबत जावे, हे एवढं सहज नाही. आजपर्यंत आमची कोणाबरोबरही चर्चा झाली नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नावर आम्ही गंभीरपणे चर्चा करणार आहोत.'', असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर अद्यापही सस्पेन्स कायम असल्याचं दिसून येतंय.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाप्रफुल्ल पटेलसंजय राऊत