लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत; पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना, याचा विचार राजकारण्यांसह सर्वांनीच करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचे होते, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विरोधकांना फटकारले. आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करा, जनतेच्या जिवाशी खेळू नका, असेही ते म्हणाले.
कोविड राज्य कृतिदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्य कोविड कृतिदलाचे सदस्य आणि राज्यभरातील डॉक्टर्स उपस्थित होते.आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली असली तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी याप्रसंगी केले. अजूनही राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे. त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्ससह अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात आहेत.
कोरोनाची तिसरी लाट थोपवायची की?nगेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यंदा रुग्ण याआधीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. nतिसरी लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे, हे आपण सर्वांनी ठरवावे, असे सांगतानाच लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.ऑक्सिजन निर्मितीवाढविण्याचे उद्दिष्टnआजही आपल्याकडे ऑक्सिजन कमी आहे. रोज ३ हजार मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. ही क्षमता गाठावी लागेल nइतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
आपण ज्या गोष्टी उघडत आहोत, त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारलाच निवडणुका नकोराज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे राज्यातील सरकारचे काही काळेबेरे असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा.- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना