Eknath Shinde: शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:26 PM2022-07-01T13:26:30+5:302022-07-01T13:28:08+5:30

एकनाथ शिंदे यांच्यासमेवत गेलेल्या शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांना आणि 11 अपक्षा आमदारांपैकी कोणाकोणाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार याची चर्चा होत असतानाच, आता रिपाइंच्या आठवले गटाकडूनही मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

We should be given a place in Shinde's cabinet, Athavale reminded us of allies | Eknath Shinde: शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण

Eknath Shinde: शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देत भाजपने सर्वांनाच धक्का दिला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवता दुसरा धक्का भाजपने दिला. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर देशात महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होत आहे. तर, आता मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध सर्वांनाच लागले आहे. त्यातच, 3 आणि 4 तारखेला एकनाथ शिंदेंना बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार असून आपल्याकडे 175 आमदारांचं संख्याबळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. 
 
एकनाथ शिंदे यांच्यासमेवत गेलेल्या शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांना आणि 11 अपक्षा आमदारांपैकी कोणाकोणाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार याची चर्चा होत असतानाच, आता रिपाइंच्या आठवले गटाकडूनही मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपाइं आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे. भाजपचा सह्योगी गट असल्याने रिपाइं गटालाही शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंचं अभिनंदनही केलं आहे. 
दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी देऊन देवेंद्र फडणवीस राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. महाराष्ट्राच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य देत आदर्श इतिहास घडविल्याचेही आठवेलींनी म्हटले.


एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे आता उपराजधानी नागपूरला किमान तीन मंत्रिपदे मिळतील व विदर्भालाही झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू, परिणय फुके, संजय कुटे या अनुभवी नेत्यांसह समीर मेघे, आशिष जयस्वाल, रवी राणा यांच्या रूपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

औरंगाबादमधून संधी कुणाला?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता. औरंगाबादला कोण पालकमंत्री म्हणून लाभणार, यावरून चर्चा रंगते आहे. मागील १२ वर्षांत जिल्ह्याला बाहेरीलच पालकमंत्री लाभले आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील जे मंत्री होतील, त्यांच्याकडेच पालकमंत्री जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते.

Web Title: We should be given a place in Shinde's cabinet, Athavale reminded us of allies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.