आपल्याकडे नाइट लाइफचा कनसेप्ट हा गुलछबू रात्रीशी जोडला गेला आहे. इंग्रजीतील शब्दश: अर्थ न घेता त्यामधील गर्भितार्थ घेण्यात आला आहे. आपल्या सरकारने नाइट लाइफवर बंधने आणली आहेत. पाश्चिमात्य देशांसारखे विकसनशील असलेल्या भारताला नाइट लाइफ परवडणारे नाही. आपल्याकडील महिलावर्ग आजही सुरक्षित नसून सातच्या आत घरात... ही संकल्पना नोकरदार महिलांनी बाद ठरवली नसली तरी कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला पहाटे घरी येतात. मात्र, त्यांना ड्रॉप व पिकअप करण्यासाठी कंपनीच्या गाड्या असतात. आपल्याकडे तीन शिफ्टमध्ये काम चालते. रात्रपाळीच्या कामगारांना रात्रीची सोय हवी. हॉटेल्स, पावभाजी वडापाव व अंडाभुर्जीच्या गाड्या सुरू नसल्या तर रात्री पोटात काय टाकणार. कामावरून उशिरा परतणाऱ्या सिंगल लाइफ जगणाऱ्यांना उपाशी झोपल्यावाचून पर्याय उरत नाही. टॉकिजमध्येसुद्धा शेवटचा शो रात्री ९ ते १२ वाजताचा असतो. आता त्याची वेळ मेट्रो मॉलच्या बिग सिनेमामुळे १०.४५ झाली आहे. हादेखील सिनेमा रात्री १ वाजता सुटतो. घरात केबल टीव्ही आहे. हातात स्मार्टफोन आहे. व्हॉटसअॅप व फेसबुकवर चॅट करणाऱ्या तरुणाला नाक्यावर गप्पा मारणे आवडते. गप्पांची वेळ ही बहुतांशी रात्रीची असते. त्यांना रात्रीदेखील रिफे्रशमेंट हवी असते. त्यातून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने काहींना नाइट लाइफ नको तर काहींच्या कामाच्या वेळा पाहता त्यांना रात्री दुकाने सुरू हवीत, असे दोन मतप्रवाह समोर येतात. कॉलेजच्या तरुणाईला काय वाटते नाइट लाइफविषयी... त्यांना नाइट लाइफ हवे आहे की नको? काय सांगताहेत कॉलेजचे तरुण... जान्हवी मोर्येपुरुषांच्या सहकार्याची गरजमला वाटते, नाइट लाइफ असले पाहिजे. महिलांसाठी ते सुरक्षित नसेल तर त्यासाठी पुरुषांनी सपोर्ट केला पाहिजे. नाइट लाइफ यशस्वी होईल, ते अशा सपोर्टमुळेच. सामान्य माणूस रात्री नोकरीवरून परतताना त्याला भोजन व अन्य मिळणे आवश्यक आहे. सामान्यांना पैसेवाल्यांसारखे नाइट लाइफ परवडणारे नसले तरी किमान पोटोबाची सोय असावी. वर्षातून एकदा तरी नाइट लाइफचा आनंद घेण्यास हरकत नाही. नाइट लाइफ रिस्की असले तरी घरातील मंडळींचा विरोध झुगारून आम्ही घराबाहेर पडतो. मी नाइट लाइफला जातो. मला आवडते जायला. रात्रीच्या वेळी टपरीवर उकळलेल्या गरम चहाचा घुटका घेणे मला आवडते. तसेच गरमागरम खमंग भुर्जी खावीशी वाटते. थंडी व पावसाचे वातावरण असल्यास त्याला वातावरणाची जोड मिळते. सध्या आॅनलाइनच्या जमान्यात व्हॉट्सअॅप आले तरी गप्पा मारण्यासाठी नाका सुटलेला नाही. गप्पांचा फड रंगवून झाल्यावर नाश्ता केल्यावर गप्पांना पूर्णविराम मिळाला, असे मनापासून वाटते. पुन्हा दुसऱ्या दिवसासाठीच्या गप्पांकरिता एनर्जी मिळते.- निखिल शिरोळे, बारावी, (बिर्ला महाविद्यालय)चंगळवादासाठी नाइट लाइफ नसावेमित्रमैत्रिणींशी गप्पा मारून उशीर झाल्यावर गाडीवर चहा, वडापाव, भुर्जी खाण्यासाठी जाण्याकरिता नाइट लाइफ सुरू राहिले पाहिजे. रात्री मुलेमुली बाहेर पडल्यावर आईवडिलांना काळजी वाटते. दुकाने बंद करण्यात येऊ नयेत. नाइट लाइफचा पोलीस यंत्रणांकडून बाऊ केला जातो. लेडिज बार, बीअर बार, पब, मॉल्स सुरू ठेवण्यास परवानगी देऊ नये. चंगळवादासाठी नाइट लाइफ सुरू असू नये. सामान्यांच्या भुर्जीच्या व वडापावच्या गाड्या बंद करून काय उपयोग? सामान्यांच्या जगण्यावर गदा आणण्यात पोलीस व सरकारला जास्त रस असतो. त्यासाठी सुरक्षिततेचे कारण पुढे केले जाते. तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण पुढे केले जाते. याचा अर्थ सामान्यांनी घराबाहेर रात्री पडायचे नाही. त्यांनी त्यांची सगळी कामे दिवसाच करायची. पण, काही वेळा प्रसंग आल्यावर त्याने कुठे जायचे, असा सवाल आहे. तो अनुत्तरीतच राहतो.प्रज्वल कांचन, टी.वाय.बी.कॉम. (पेंढरकर महाविद्यालय)नाईट लाईफ : गुन्हेगारी रेशो कमी हवानाइट लाइफ युवा पिढीसाठी योग्य आहे की नाही, हे पडताळून पाहताना ते कोणासाठी आहे, हे महत्त्वाचे ठरते. भारत हा विकसनशील देश आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे नाइट लाइफला बंदी घालावी की ते सुरू ठेवावे, याचा वाद असला तरी महिला सुरक्षिततेसाठी मला नाइट लाइफ नको वाटते. कारण, ते महिलांसाठी सेफ नाही. मुंबई ही रातों की नगरी, मायानगरी असे संबोधले जाते. मुंबई ही दिवसरात्र जागीच असते. तरीसुद्धा ती सेफ नाही, विशेषत: महिलांसाठी. आजही सुरक्षिततेसाठी महिलांना नाइट नोकरी करू दिली जात नाही. मला स्वत:ला नाइट नोकरीची एक संधी आली होती. त्याला वडिलांनी विरोध केला. नाइट लाइफ सेफ नसल्यानेच त्यांनी नकार दिला. इतकेच काय, रात्रीच्या नोकरीसाठी मुलींना इतर शहरांत अनुमती दिली जात नाही. हा नकार देण्यामागे त्यांची काळजी असते. आईवडिलांना काळजी राहणारच. नाइट लाइफ असावे, मात्र ते सुरक्षित असायला हवे. गुन्हेगारीचा रेशो कमी झाला तर नाइट लाइफची धास्ती कमी होईल. पैसेवाली मंडळी नाइट लाइफ एन्जॉय करते. सामान्यांच्या खिशात पैसा नसल्याने त्यांना ते परवडणारे नाही. स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिल्याशिवाय नाइट लाइफ शक्य होणार नाही, असे मला वाटते.