परिसर स्वच्छ आम्ही करू समाजातील मानसिक स्वच्छता कोण करणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 05:04 PM2020-10-02T17:04:20+5:302020-10-02T17:05:06+5:30
Women Security : महिलांच्या सुरक्षिततेविषयी मनसेने उठविला आवाज
मुंबई : आजच्या गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाची सांगड घालत परिसर आम्ही स्वच्छ करू समाजात पसरलेली विकृत मानसिकता स्वच्छ करणार का महिलांना सुरक्षा आपण देणार का असा सवाल सरकारला करत मनसेने महिलांच्या सुरक्षिततेविषयी आवाज उठविला.
हाथरस येथे महिलेवर झालेल्या आत्याचाराची घटना माणुसकीला काळिमा फसणारी आहे महिलांवर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे शासना पर्यंत आवाज पोहचविण्यासाठी स्वच्छता मोहिमेची सांगड घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे मनसेचे माहीम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
गांधी जयंती निमित्त आज वरळी येथील गोपाळ नगर व बावन चाळ परिसरात मनसेच्या वतीने स्वच्छता अभियान व ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस समाजात पसरलेली मानसिक विकृती यावर लक्ष वेधत महिलांवर होणारे अत्याचार व सुव्यवस्था यावर सवाल उपस्थित करण्यात आले.
परिसर स्वच्छ आम्ही करू मानसिक स्वच्छता करणार का, महिलाना सुरक्षा आपण देणार का, नराधमाना शिक्षा देणार का, निर्भयाना जलदगती न्याय मिळणार का अशा सवालांचे फलक हातात घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.
महिलांच्या सुरक्षिततेविषयी कठोर कायदा केला पाहिजे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे खटले जलद न्यायालयात करून त्यांना फासावर लटकविले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.