Join us

"आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच, लढेंगे और जितेंगे", संजय राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:23 AM

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे.

मुंबई-

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. यातच आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं दावा ठोकला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता ट्विट करुन सहावी जागा शिवसेना लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच विरोधकांवरही निशाणा साधला आहे. 

"राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा...त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे.", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

शिवसेनेनं राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी दावा केल्यानंतर संभाजी राजेंनाही धक्का मिळाला आहे. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व विधानसभा आमदारांना काल एक भावूक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या आमदारांना सूचक आवाहन केलं आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य आहे. खरी लढत सहाव्या जागेसाठी होणार आहे. यात आता शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी दावा केला असून महाविकास आघाडी ही जागा निवडून दाखवेल असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :संजय राऊतराज्यसभा