Petrol Price Cut: थेट ३५ दिवसांपूर्वीच्या दराने उद्या मिळणार पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 07:18 PM2018-10-04T19:18:05+5:302018-10-04T19:19:28+5:30

तब्बल ३५ दिवसांपूर्वी, ३० ऑगस्टला मुंबईत पेट्रोलचा साधारण इतकाच दर होता. त्यानंतर तो वाढत-वाढत ९१.३४ रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचला. 

we will get petrol at 30 august price tomorrow after petrol diesel price cut | Petrol Price Cut: थेट ३५ दिवसांपूर्वीच्या दराने उद्या मिळणार पेट्रोल

Petrol Price Cut: थेट ३५ दिवसांपूर्वीच्या दराने उद्या मिळणार पेट्रोल

Next

मुंबईः केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोलच्या दरांमध्ये प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्यामुळे पेट्रोलची किंमत झटक्यात पाच रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर मुंबईत ८५ रुपये ८१ पैसे लिटर या दराने पेट्रोल मिळणार आहे. तब्बल ३५ दिवसांपूर्वी, ३० ऑगस्टला मुंबईत पेट्रोलचा साधारण इतकाच दर होता. त्यानंतर तो वाढत-वाढत ९१.३४ रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचला. 

केंद्र सरकारने पेट्रोलसोबतच डिझेलचे दरही अडीच रुपयांनी कमी केलेत. त्यामुळे डिझेलचा दर उद्या ७७.६० रुपये प्रती लिटर असेल. याआधी १२ सप्टेंबरला डिझेलचा दर प्रती लिटर ७७.५५ रुपये होता. तो आज ८०.१५ पैसे झाला होता. 


इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन  करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला ८०चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली आहे. 


पेट्रोल दरवाढीतील महत्त्वाचे टप्पेः 

३० ऑगस्ट - ८५.७७ रुपये 
३१ ऑगस्ट - ८५.९८ रुपये
३ सप्टेंबर - ८६.६५ रुपये (६७ पैशांची वाढ)
७ सप्टेंबर - ८७.४८ रुपये (४८ पैशांची वाढ) 
१० सप्टेंबर - ८८.२१ रुपये (७३ पैशांची वाढ)
१२ सप्टेंबर - ८८.३५ रुपये (दरवाढ नाही)
२३ सप्टेंबर - ९०.०६ रुपये (२८ पैसे वाढ, गाठली नव्वदी)
१ ऑक्टोबर - ९१.१५ रुपये (२२ पैशांची वाढ)


Web Title: we will get petrol at 30 august price tomorrow after petrol diesel price cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.