मुंबईः केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोलच्या दरांमध्ये प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्यामुळे पेट्रोलची किंमत झटक्यात पाच रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर मुंबईत ८५ रुपये ८१ पैसे लिटर या दराने पेट्रोल मिळणार आहे. तब्बल ३५ दिवसांपूर्वी, ३० ऑगस्टला मुंबईत पेट्रोलचा साधारण इतकाच दर होता. त्यानंतर तो वाढत-वाढत ९१.३४ रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचला.
केंद्र सरकारने पेट्रोलसोबतच डिझेलचे दरही अडीच रुपयांनी कमी केलेत. त्यामुळे डिझेलचा दर उद्या ७७.६० रुपये प्रती लिटर असेल. याआधी १२ सप्टेंबरला डिझेलचा दर प्रती लिटर ७७.५५ रुपये होता. तो आज ८०.१५ पैसे झाला होता.
इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला ८०चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली आहे.
Maharashtra Government also decided to give additional relief of ₹2.5/litre on Petrol to give total benefit of ₹5/litre in the State of Maharashtra.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
पेट्रोल दरवाढीतील महत्त्वाचे टप्पेः
३० ऑगस्ट - ८५.७७ रुपये ३१ ऑगस्ट - ८५.९८ रुपये३ सप्टेंबर - ८६.६५ रुपये (६७ पैशांची वाढ)७ सप्टेंबर - ८७.४८ रुपये (४८ पैशांची वाढ) १० सप्टेंबर - ८८.२१ रुपये (७३ पैशांची वाढ)१२ सप्टेंबर - ८८.३५ रुपये (दरवाढ नाही)२३ सप्टेंबर - ९०.०६ रुपये (२८ पैसे वाढ, गाठली नव्वदी)१ ऑक्टोबर - ९१.१५ रुपये (२२ पैशांची वाढ)