स्पीड बोट अपघाताची सखोल चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 08:24 PM2018-10-24T20:24:32+5:302018-10-24T20:28:34+5:30
सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या स्पीड बोट अपघाताची चौकशी होणार आहे.
मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी स्पीड बोट अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या स्पीड बोट अपघाताची चौकशी होणार आहे.'
शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळून बुडाली. या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या बोटीवर 25 जण होते. यापैकी 24 जणांना वाचवण्यात यश आले असून सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पायाभरणीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.