आम्ही तुमचा कुठलाही "कॉल" "मिस" होऊ देणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:05+5:302021-02-11T04:07:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रवास करताना फोन टॅक्सीतच राहिल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली. एनएम जोशी ...

We will not allow any of your "calls" or "misses"! | आम्ही तुमचा कुठलाही "कॉल" "मिस" होऊ देणार नाही!

आम्ही तुमचा कुठलाही "कॉल" "मिस" होऊ देणार नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवास करताना फोन टॅक्सीतच राहिल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तरुणीचा मोबाईल शोधून तरुणीच्या ताब्यात दिला. यावेळी ''आम्ही तुमचा कुठलाही ''कॉल'' ''मिस'' होऊ देणार नाही!'' असे म्हणत पोलिसांनी ट्विट केले.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत ५१ हजार ६८ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. यापैकी ४० हजार ३९० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०१९ मध्ये हाच आकड़ा ४१ हजार ९३१ होता.

यात हत्या (१४८), हत्येचा प्रयत्न (३४८), दरोडा (१५), सोनसाखळी चोरी (७५२), खंडणी (२०४), घरफोडी (१,६४५), वाहन चोरी (२,८०१), दुखापत (३,८०८), दंगल (३२४), बलात्कार ( ७६७), विनयभंग (१,९४५), तर अन्य (३४,८७८) गुन्ह्यांचा समावेश आहे.

अशात चोरीच्या ३ हजार ४३३ गुन्ह्यांची नोंद आहे. यात मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. यात, पोलिसांकड़ून मोबाईल चोरीच्या अनेक आरोपींची धरपकड़ करण्यात येत आहे. गुन्हे शाखेनेही अनेक आरोपींचा पर्दाफाश केला आहे. यात अनेक रहिवाशांना त्यांचे मोबाईल परत मिळवून दिले आहेत.

.....

ज्येष्ठ नागरिक हातात सॉफ्ट टार्गेट

अशात रस्त्याने एकटे जात असलेले ज्येष्ठ नागरिकही यात सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहेत. यात, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनाही घडत आहेत.

.....

मोबाईल चोरीच्या संशयातून हत्येच्याही घटनांची भर

मोबाईल चोरीच्या संशयातून मुंबईत हत्येच्याही घटना घडल्या आहेत.

....

धूम स्टाईलने मोबाईल चोरी

अनेक प्रकरणांमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेली टोळी मोबाईल हिसकावून पळ काढताना दिसत आहेत, तर काही घटनांमध्ये घरातून मोबाईल चोरी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, तर कुठे नागरिकांकड़ून मोबाईल हरवल्याच्या तक्रारीचे प्रमाणही अधिक आहे.

....

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळा

अशात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. तसेच एकटे जात असतानाही काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलिसांकड़ून देण्यात येत आहेत.

....

Web Title: We will not allow any of your "calls" or "misses"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.