Navneet Rana : राणा विरुद्ध सेना! उद्या सकाळी ९ वाजता 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करणार म्हणजे करणारच, राणा दाम्पत्य ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:28 PM2022-04-22T15:28:28+5:302022-04-22T15:35:14+5:30

We will reached Matoshri Tomorrow at 9 am for Hanuman Chalisa says navneet and ravi rana : राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी निघून जावे यासाठीच राज्याचे प्रथम नागरिक असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'समोर हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली

we will reached Matoshri Tomorrow at 9 am for Hanuman Chalisa says navneet and ravi rana | Navneet Rana : राणा विरुद्ध सेना! उद्या सकाळी ९ वाजता 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करणार म्हणजे करणारच, राणा दाम्पत्य ठाम

Navneet Rana : राणा विरुद्ध सेना! उद्या सकाळी ९ वाजता 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करणार म्हणजे करणारच, राणा दाम्पत्य ठाम

Next

मुंबई-

राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी निघून जावे यासाठीच राज्याचे प्रथम नागरिक असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'समोर हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली. पण त्यावर आम्हाला मुंबईत येऊन दाखवाच अशी धमकी दिली गेली. आम्ही आजही मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असून उद्या सकाळी ९ वाजता आम्ही मातोश्रीवर पोहोचू, अशी ठाम भूमिका आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा Navneet Rana यांनी जाहीर केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन मातोश्री परिसरात जाऊ नये त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. पण हनुमान चालीसाचा पठण करण्यापासून उद्धव ठाकरे देखील आम्हाला अडवू शकत नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या. 

"हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. मातोश्री हे आमचंही श्रद्धास्थान आहे. बाळासाहेबांचे विचार ऐकून आम्ही मोठे झालो आहोत. आम्ही श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. त्यामुळे आम्हाला रोखण्याचं काहीच कारण नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. दहशतवादी नाही. आम्ही काही शस्त्र हातात घेऊन मातोश्रीवर जात नाहीय. आम्ही तर हनुमान चालीसा घेऊन जाणार आहोत. शिवसैनिकांनी आम्हाला आव्हान दिलं. तुमचा हनुमान चालीसाला विरोधा का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच", असं नवनीत राणा म्हणाल्या. 

स्टंटबाजीची गरज आम्हाला नाही
"आम्ही १६ तास जनतेत राहून काम करुन निवडून आलेले आमदार आणि खासदार आहोत. बाळासाहेबांच्या विचारांनीच आम्ही मोठे झाले आहोत. निवडणुक देखील जवळ नाही. त्यामुळे स्टंटबाजीचा मुद्दाच नाही. शिवसेनेलाच पराभूत करुन मी माझ्या मतदार संघात निवडून येते आणि भाजपाशी नाव जोडून आमची बदनामी करू नये. जर स्टंट बाजी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसाला विरोध का करत आहात? याचं उत्तर द्यावं", असं नवनीत राणा म्हणाल्या. 

संजय राऊत पोपट, रोज सकाळी उठून बडबडतात
संजय राऊतांनी तुमचा उल्लेख बंटी-बबली असा केला आहे. असं विचारलं असता नवनीत राणा यांनी संजय राऊत हे तर पोपट आहेत. रोज सकाळी पत्रकारांना बोलावून बडबड करायची. त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नसतं. शिवसेनेला हरवूनच मी खासदार झाले आहे. त्यांनी स्टंटबाजीची भाषा आमच्याशी करू नये, असं नवनीत राणा म्हणाल्या. 

Web Title: we will reached Matoshri Tomorrow at 9 am for Hanuman Chalisa says navneet and ravi rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.