मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:09 PM2022-09-30T13:09:54+5:302022-09-30T13:10:33+5:30

मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी दिले.

We will work in the footsteps of Eknath Shinde, says that Guardian Minister Shambhuraj Desai assures | मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे यापूर्वीचे पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याकरिता बरेच काम केले आहे. आता ठाण्याचा नवा पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्याकरिता काम करणार असल्याची ग्वाही राज्य उत्पादनशुल्कमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दिली. 

पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देसाई प्रथमच ठाण्यात आले होते. त्यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. देसाई म्हणाले की, शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करणार आहे. ठाणे जिल्हा खूप मोठा आहे. येथे काम करताना मुख्यमंत्री ज्या सूचना देतील आणि जी दिशा दाखवतील तसेच काम करीन. आमची श्रद्धा आहे की, यापुढेही आम्ही आमचे मुख्य नेते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य करीत आहोत त्यालाच या देवीचा आशीर्वाद राहील, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: We will work in the footsteps of Eknath Shinde, says that Guardian Minister Shambhuraj Desai assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.