लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘दाग अच्छे है’ या आशयाची जाहिरात आपण पाहिली असेल. आता ‘रिंकल्स अच्छे हैं’ ही जाहिरात नव्हे तर एक उपक्रम आहे आणि त्याद्वारे दर सोमवारी सुमारे १,२५,००० किलो कार्बन उत्सर्जन वाचवले जाऊ शकते आणि त्यासाठी कर्मचारी त्या दिवशी विनाइस्त्रीचे कपडे परिधान करू शकतात, असे आवाहन आयआयटी मुंबईचे प्रा. चेतन सिंह सोलंकी यांनी केले आहे.
‘रिंकल्स अच्छे हैं’ उपक्रमाचा उद्देश प्रत्येकाला ऊर्जा बचत, हवामान बदलाविषयी जागरूकता पसरवण्याविषयी आग्रह धरणे आहे.
६,२५,००० लोक उपक्रमात सहभागी...n‘जेव्हा लाखो लोक असे करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन बचत होते आणि एक नवीन फॅशनही येऊ शकते. nआम्ही सोमवारी १,२५,००० किलो कार्बन उत्सर्जन वाचवत आहोत. माझी इच्छा आहे की, या वर्षअखेरपर्यंत १ कोटीलोक या मोहिमेत सामील होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
एक जोड इस्त्री न केल्यास काय होते?‘एनर्जी स्वराज’ चळवळीचे संस्थापक चेतन सिंह सोलंकी म्हणाले, आम्ही दर सोमवारी सुमारे १,२५,००० किलो कार्बन उत्सर्जन वाचवत आहोत. हवामान बदलाचा एक सोपा उपाय म्हणजे ‘नॉट-डूइंग-समथिंग’. आमची ‘रिंकल्स अच्छे हैं’ मोहीम बाळसे धरत आहे. यामध्ये आम्ही लोकांना इस्त्री नसलेले कपडे घालण्याचे आवाहन करत आहोत.