Join us

ग्लॅमरस लूकसाठी साजेशी हेअरस्टाईल

By admin | Published: October 11, 2015 12:47 AM

बदलत्या काळाच्या ओघात पारंपरिक सण-उत्सवांतही आधुनिकता आल्याचे पाहायला मिळते. उत्सवांच्या सेलीब्रेशनचे फक्त धार्मिक स्वरूप न राहता त्यातही फॅशन आणि

- प्राची सोनवणे, नवी मुंबईबदलत्या काळाच्या ओघात पारंपरिक सण-उत्सवांतही आधुनिकता आल्याचे पाहायला मिळते. उत्सवांच्या सेलीब्रेशनचे फक्त धार्मिक स्वरूप न राहता त्यातही फॅशन आणि ग्लॅमरचे महत्त्व वाढले आहे. ट्रॅडिशनल लूकसाठी आता पोशाखाबरोबरीनेच त्याला साजेशी हेअरस्टाईल करण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला आहे. चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी तरु णींबरोबरच तरु णांनीही आधुनिक केशरचनेचे फंडे वापरायला सुरु वात केली आहे.नऊ दिवसांच्या नऊ वेगवेगळ्या लूकसाठी हेअरस्टायलिस्ट आणि एक्सपर्टची मागणी वाढली आहे. ब्युटीपार्लरमध्ये यासाठी दांडियासाठी विशेष पॅकेज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये नऊ दिवसांच्या पोशाखाला साजेशी हेअरस्टाईल, त्यानुसार मेकअप आणि एक्सेसरीस असा हा नवा फंडा पार्लरचालकांनी राबविला आहे. यासाठी  सून, हल्लीची हौशी तरु णाई या फेस्टिव्हल फॅशनसाठी मात्र मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. या फेस्टिव्हल सीझनमध्ये शहरातील पार्लरला सुगीचे दिवस आले आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवर २० टक्के डिस्काउंट, ग्रुपने आल्यास ३० ते ४० टक्के डिस्काउंट, अथवा काही ठरावीक सौंदर्यप्रसाधने मोफत देण्याचा एक आगळावेगळा प्रकार पाहायला मिळतो.स्ट्रेटनिंगची के्रझकेसांना सिल्की आणि ग्लॅमरस लूक येण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात स्ट्रेटनिंगचा फंडा वापरला जातो. यामध्ये मुलींबरोबरच मुलेही केस वाढवून स्ट्रेटनिंग करून घेत असल्याचे पाहायला मिळते. स्ट्रेटनिंगसाठी पार्लमध्ये ५०० रु पयांपासून ते ८००० रुपयांपर्यंतचे दर आकारले जात आहेत.

कलरफुल लूककेसांना कलर करणे हा तरु णाईच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग असून यामध्ये बरगंडी, लाल या सामान्य रंगांबरोबरच आता पोशाखाच्या रंगानुसार केस रंगविण्याचा वाढता कल पाहायला मिळतो आहे. संपूर्ण केसांना कलर न करता फक्त काही ठरावीक भागांना कलर करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे.

कर्ली लूकची चलतीडॅशिंग लूक देणाऱ्या कर्ली हेअरस्टाईललाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कृत्रिमरीत्या कर्ली लूक देण्यासाठी ६०० रुपयांपासून पुढे दर आकारले जातात. बॉलीवूड अभिनेत्रींच्या कर्ली लूकला तरु णाईने मोठ्या प्रमाणात पसंती दाखविल्याने याकडे दिवसेंदिवस कल वाढत असल्याचे पाहायला मिळते.हायलाइट, स्ट्रेटनिंग, कर्ल लूक तसेच आकर्षक रंगांची भुरळ तरुणाईला पाडली असून, यासाठी गेल्या महिनाभरापासून गर्दीची लाट सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत महिलावर्गाला प्रत्येक दिवशी एक नवा लूक हवा असल्याने त्यानुसार विविध केशरचना केल्या जात आहेत. गरबा खेळताना केसांचा व्यत्यय येऊ नये, अशा हेअरस्टाईलला जास्त पसंती आहे.- जया लोंढे, हेअर स्टाईलिस्ट