Join us

तुंबापुरीला हवामानच जबाबदार, मासिक आढावा बैठकीत आयुक्तांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:45 AM

मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले.

मुंबई : मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. असाधारण हवामानामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा सूर आयुक्त अजय मेहता यांनी पालिका अधिकाºयांच्या बैठकीतही लावला. एवढेच नव्हेतर, अधिकाºयांच्या परिश्रमामुळेच एका रात्रीत मुंबई पूर्ववत झाल्याचे, प्रशस्तिपत्रकच त्यांनी आपल्या पथकाला दिले आहे.२९ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. याचा फटका रेल्वे सेवेला बसून जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत सहा पम्पिंग स्टेशन, ३०३ पंप बसविले असतानाही पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास बराच अवधी गेला. याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायलयानेही घेतली. मात्र अष्टमीच्या भरतीचे हे प्रताप, असा दावा करत आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये खळबळ उडवली होती. मुंबई महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीतही प्रशासनाने हवामान व पावसालाच दोष दिला आहे. प्रत्येक तासाला ५० मिलीमीटर एवढ्या प्रमाणातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता आहे. यापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे त्या दिवशी हिंदमाता परिसर, शीव परिसरातील गांधी मार्केटचा भाग यांसह अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. अशा ठिकाणांचा व परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर आधारित कृती आराखडा तयार करण्यास अधिकाºयांना सांगण्यात आले आहे.पंपांनी केली फजिती-पाण्याचा निचरा करण्यासाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ३१० ठिकाणी पंप बसवण्यात आले. या पंपांपैकी २१० पंप सुरू होते. नाना चौक हा परिसर सखल भाग म्हणून ओळखला जातो. क्लिव्ह लँड बंदर आणि लव्हग्रोव्ह बंदर पम्पिंग स्टेशनमुळे या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार कमी होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. तरीही या भागात पाणी तुंबल्यावर या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले.मात्र हे पंप सुरू असूनही पाण्याचा निचरा होत नव्हता. या वेळी यापंपामध्ये डिझेल टाकून केवळ आवाज केला जात होता, अशी नाराजीस्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. हीच परिस्थिती मुंबईतील अन्य भागांमध्ये होती.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबई महानगरपालिका