Weather Forecast: वादळी वारा अन् जोरदार पाऊस; राजधानी मुंबईत आज कसे असेल हवामान?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:24 AM2024-07-26T11:24:15+5:302024-07-26T11:24:57+5:30
मुंबई शहरात आज अधूनमधून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain Update ( Marathi News ) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मागील काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. राजधानी मुंबईतही संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज पुन्हा एकदा मुंबई शहर व उपनगरांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे..
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज अधूनमधून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच पावसाचं थैमान आजही कायम राहणार असून शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
भरती-ओहोटी कधी?
भरती - दुपारी - ०३:३२ वाजता - ४.४६ मीटर
ओहोटी - रात्री - ०९:४४ वाजता - ०.९८ मीटर
भरती - (उद्या - दि.२७.०७.२०२४) पहाटे - ०४:०६ वाजता - ३.९६ मीटर
ओहोटी - (उद्या - दि.२७.०७.२०२४) - सकाळी - ०९:४२ वाजता - १.५४ मीटर
काल सकाळी ८ ते आज सकाळी ८ वाजेपर्यंत या २४ तासांच्या कालावधीत मुंबई महानगरात कोसळलेला सरासरी पाऊस
मुंबई शहर - ८१ मिमी.
पूर्व उपनगरे - ८० मिमी.
पश्चिम उपनगरे - ९२ मिमी.
२४ तासांत सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)
- नारळवाडी महानगरपालिका शाळा, वाकोला १४२.२
- शिवडी - कोळीवाडा महानगरपालिका शाळा, शिवडी १३७.६
- एन विभाग कार्यालय, घाटकोपर १३३.३४
- चारकोप सेक्टर १ महानगरपालिका शाळा, कांदिवली (पश्चिम) १३१.८
- मागाठाणे बस आगार, बोरिवली १२९.२
- एकसर महानगरपालिका शाळा, बोरिवली (पश्चिम) १२८.२
- बर्वे नगर महानगरपालिका शाळा, घाटकोपर (पश्चिम) १२५.२
- वांद्रे-कुर्ला संकूल अग्निशमन केंद्र १२४
- नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा (पूर्व) ११९.४०
- पर्जन्य जलवाहिनी विभाग कार्यशाळा, दादर ११९.३४
- मारवली महानगरपालिका शाळा, चेंबूर ११८.६०
- एन. एम. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, लोअर परळ ११७
दरम्यान, गुरुवारी भल्या पहाटे पावसाने जोर पकडला होता. विशेषत: सकाळी ८ नंतर सुरू झालेला पाऊस दहा वाजेपर्यंत कोसळत होता. काहीसा ब्रेक घेतल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पावसाने मारा सुरूच ठेवला होता. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. दुपारी जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टनंतर विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली. सकाळी १० वाजेपासून दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पडलेला पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. दुपारनंतर सायंकाळपर्यंत मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.