Join us  

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; शहरात मान्सून सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 6:17 AM

पश्चिम उपनगरात सर्वत्र पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सक्रिय झालेल्या मान्सूनने बुधवारी मुंबईकरांना बऱ्यापैकी झोडपले. अधून-मधून दाखल होणाऱ्या सरींमुळे मुंबईकरांची धावपळ होत होती. 

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने २० जूनदरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. मुंबईत बुधवारी सकाळपासूनच चांगल्या पावसाला सुरुवात झाली. सकाळी पडलेला पाऊस पाहता दिवसभर त्याचा मारा कायम राहील, अशी भीती मुंबईकरांना वाटत होती. पश्चिम उपनगरात सर्वत्र पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू होती. सकाळी दहानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून दाटून येणारे ढग मुंबईकरांना पावसाची भीती घालत होते.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमोसमी पावसाचा अंदाज