मुंबई : एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा धोका आणखी वाढणार असून, या उष्णतेच्या लाटांना थोपविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता कृती योजना स्थानिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी उष्णतेच्या लाटांचा जोर वाढत राहिल्यास त्याचा फटका मनुष्यप्राण्यासह अर्थव्यवस्थेला मोठा बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी देश किती सज्ज आहे, हे समजून घेण्यासाठी सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चने १८ राज्यांच्या ३७ उष्णता कृती योजनांचे मूल्यांकन केले आहे. त्यानुसार, यातील बहुतांश उष्णता कृती योजना ढोबळ आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कारण या योजना तयार करताना स्थानिक संदर्भ लक्षात घेण्यात आलेले नाहीत.
चार दिवस धाेक्याचे पूर्व भागांत पुढील चार दिवस आणि वायव्य भागात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे, बंगाल व बिहारचे गंगेचे खाेरे तसेच सिक्कीम, ओडिशा आणि झारखंडमध्येही पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहू शकते.
भारताने अनेक डझन उष्णता कृती योजना तयार केल्या. मात्र, यातील अनेक त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा अर्थव्यवस्थेला मोठा धोका संभवतो. - आदित्य वलियाथन पिल्लई, असोसिएट फेलो, सीपीआर
कुठे पाऊस झोडपणार? १८ ते २० एप्रिल दरम्यान पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीर व लडाखच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १८-१९ एप्रिल रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असे हवामान खात्याने सांगितले.
प्रमुख निष्कर्षn दमट उष्णता आणि उबदार रात्रींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे योजना दुर्लक्ष करतात.n ३७ योजनांपैकी फक्त १० योजनांमध्ये स्थानिक पातळीवरील तापमान मर्यादांचा विचार करण्यात आला आहे.n भविष्यातील गरजा ओळखण्यास मदत करणारे हवामान अंदाज सध्याच्या उष्णता कृती योजनांमध्ये समाविष्ट नाहीत.n ३७ योजनांपैकी ३ योजनांना निधीच्या स्रोतांची माहिती आहे. निधीची गंभीर कमतरता जाणवते.n उष्णता कृती योजना राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाहीत. खूप कमी योजना ऑनलाइन उपलब्ध आहेत.