Maharashtra Weather Update: अलर्ट! राज्यात पुढील ४ दिवसांत कोकण, मराठवाड्यात मुसळधार; मुंबई, ठाण्यासह पालघरला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:49 PM2021-09-04T15:49:37+5:302021-09-04T15:51:19+5:30
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी राज्यात पावसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी राज्यात पावसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होऊ शकते. (Weather Update IMD predict heavy rainfall at Kokan and Marathwada major rain at mumbai thane palghar)
राज्यात ७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अहमदनगर, बीड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, हिंगोळीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2021
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर. TC pic.twitter.com/eKoxbVul0r
कोकण पट्ट्यात पुढील चारही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सागरी किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
५ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्गला इशारा
हवामान विभागाकडून उद्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.