पुन्हा अवकाळीचा इशारा; देशातील बहुतांश राज्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:25 AM2023-03-13T06:25:20+5:302023-03-13T06:25:48+5:30
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे देशातील बहुतांशी राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे देशातील बहुतांशी राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यानुसार १५ ते १७ मार्च दरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी बदलत्या हवामानाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,१४ ते १६ मार्चदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशमध्ये ताशी ४० किमी वेगाने वारे वाहतील. तर तुरळक ठिकाण ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस पडेल. १२ ते १४ मार्च दरम्यान गुजरातमध्ये विजांचा कडकडाट होईल. १३ ते १६ मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात बदल होतील. तर १४ ते १६ मार्चदरम्यान पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड राज्यात हवामानात उल्लेखनीय बदल होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"