पीपीईसाठी आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:34 PM2020-04-08T15:34:11+5:302020-04-08T15:34:35+5:30

आवश्यकता आणि पुरवठा यांची माहिती मिळणे होणार सोपे...

Website creation by IIT Bomb for PPE | पीपीईसाठी आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती 

पीपीईसाठी आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती 

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा सामना करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्हज आणि गाऊन यासारखी वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट)उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पीपीई किटसाठी मदत व्हावी या उद्देशाने आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे  या  संकेत स्थळावर कोणाला,  किती , कुठे पीपीई लागणार आहेत ? कोणाजवळ ते उपलब्ध आहेत किंवा कोण त्याचा पुरवठा करू शकते याची माहिती मिळणे शक्य होणार आहे फक्त मुंबईतून नाही तर देशभरातून पीपीई कीटची माहिती यावर मिळू शकणार आहे.  

आयआयटी बॉम्बेच्या या मोहिमेमध्ये आयआयटी हैदराबादने सहकार्याचा हात पुढे केला आहे. या आधी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी व मास्क, ग्लोव्हज सारखी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी  बॉम्बेकडून ५०० पेक्षा अधिक गट व स्वयंसेवक तयार केलंले आहेत. या मध्ये सहभागी होण्यासाठी https://www.covidindiainitiative.org हे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक  कॉलेज, उच्च शैक्षणिक संस्थांमधील केमिकल, केमिस्ट्री, बायोलॉजी लॅब, टेस्टिंग लॅब, डेंटल हॉस्पिटल, इंडिस्ट्रीज बंद आहेत. त्यामुळे येथे वापरात येणारे मास्क, ग्लोव्हज मिळवण्यासाठी आयआयटी बॉम्बेचे स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत. तसेच पीपीईचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी स्वस्त दरात हे साहित्य उपलब्ध करून द्यावेत यासाठी ते प्रयत्नशील आहे. आयआयटी बॉम्बेकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती यूट्यूबवरही उपलब्ध करून दिली आहे.

 

काय माहिती मिळणार ?

या संकेत स्थळावर  कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पीपीईचा उपलब्ध साठा, गरज असलेली ठिकाणे, टंचाईमुळे कर्मचाऱ्यांना करावा लागत असलेला सामना, पीपीईचे उतपादन आणि वितरकांची माहिती तसेच पीपीई उपलब्ध करून देणाऱ्या दात्यांची माहिती सर्वसामान्यांना इथे मिळू शकणार आहे .  https://www.ppecovid.in/ या संकेतस्थळावरून एखाद्या दात्याला पीपीईची आवश्यकता कोठे अधिक आहे आणि आपल्याला कोठे दान करता येऊ शकते याची, तसेच एखाद्या हॉस्पिटलला कोणते दाते पीपीई उपलब्ध करून देऊ शकतात याची माहिती सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. 

 

Web Title: Website creation by IIT Bomb for PPE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.