बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी संकेतस्थळ

By admin | Published: May 22, 2016 03:31 AM2016-05-22T03:31:54+5:302016-05-22T03:31:54+5:30

बेकायदा बांधकामाची तक्रार करण्यासाठी यापूर्वी लेखी तक्रारीशिवाय पर्याय नव्हता़ पालिकेच्या हेल्पलाइनवर ही तक्रार करावी लागत होती़ तसेच या तक्रारीनुसार कारवाई झाली

Website for illegal construction complaints | बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी संकेतस्थळ

बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी संकेतस्थळ

Next

मुंबई : बेकायदा बांधकामाची तक्रार करण्यासाठी यापूर्वी लेखी तक्रारीशिवाय पर्याय नव्हता़ पालिकेच्या हेल्पलाइनवर ही तक्रार करावी लागत होती़ तसेच या तक्रारीनुसार कारवाई झाली का याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित व्यक्तीलाच पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत होते़ यावर उपाय म्हणून अखेर आॅनलाइन तक्रार पद्धत सुरू करण्यात आली आहे़ यासाठी खास संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे़
आॅनलाइन तक्रार केल्यानंतर त्याची माहिती आयुक्तांबरोबरच सर्व संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल़ तसेच तक्रारीवर कोणती कारवाई झाली, याची माहितीही तक्रारदाराला मिळू शकेल़ या संकेतस्थळामुळे बेकायदा बांधकामांना आळा बसेल, असा पालिका प्रशासनाचा दावा आहे़ तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येणार आहे़ पालिकेत तक्रार नोंदवून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू असतात़ अशा खंडणीखोरांनाही या संकेतस्थळामुळे चाप बसणार आहे़ यासाठी तक्रार करण्यापूर्वी आधारकार्ड क्रमांक व इतर माहिती नमूद करावी लागणार आहे़ त्यामुळे एकच व्यक्ती विविध भागांतील बेकायदा बांधकामांची वारंवार तक्रार करीत असेल तर अशांचा बंदोबस्त करणेही शक्य होणार आहे़ पालिकेचे संकेतस्थळ ६६६.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल वर इमारत व कारखाना प्रस्ताव या लिंकवर ही प्रणाली उपलब्ध आहे़
६६६.१ीेङ्म५ं’ङ्माील्लू१ङ्मंूँेील्ल३.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर संपूर्ण माहितीसह नोंदणी केल्यानंतर बेकायदा बांधकामाची तक्रार करता येणार आहे़

Web Title: Website for illegal construction complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.