Join us

२६/११चे ‘बुधवार’ कनेक्शन; पुराव्यांची साखळी जोडताना उलगडला योगायोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 5:58 AM

२६/११च्या दहशतवादी हल्ला, त्याचा तपास ते कसाबला फासावर लटकविण्याच्या तारखेपर्यंत बुधवार कनेक्शन समोर आले.

मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ला, त्याचा तपास ते कसाबला फासावर लटकविण्याच्या तारखेपर्यंत बुधवार कनेक्शन समोर आले. खटल्यातील जवळपास ११ महत्त्वाच्या तारखांना बुधवार होता. हा योगायोग रमेश महाले यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे.

याबाबत बोलताना महाले यांनी सांगितले की, माझा परमेश्वरावर विश्वास असला, तरीही मी अंधश्रद्ध नाही. त्यामुळे अमुक दिवशी असे घडते आणि अमुक वारी तसे घडते, यावर मी विश्वास ठेवत नाही, पण २६/११च्या तपासाच्या काळात पुराव्यांची साखळी जोडण्यासाठी तारखांची सुसंगत मांडणी आवश्यक होती, तेव्हा हा बुधवारचा योगायोग समोर आल्याचे महाले यांनी सांगितला. त्यांनी हा किस्सा त्यांच्या पुस्तकातही मांडला आहे. २६/११च्या हल्ल्यापासून ते कसाबच्या फाशीपर्यंत बुधवारच होता.

२६ नोव्हेंबर, २००८बुधवार - मुंबईत अतिरेकी हल्ला.१८ फेब्रुवारी, २००९बुधवार - कसाबने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे कबुली देण्याची तयारी दर्शविली.२५ फेब्रुवारी, २००९बुधवार - अतिरिक्त महानगर दंडाधिकाºयांसमोर दोषारोपपत्र दाखल.१५ एप्रिल, २००९बुधवार - कसाबला कारागृहात उभारण्यात आलेल्या न्यायालयात सर्वप्रथम हजर करण्यात आले.६ मे, २००९बुधवार - कसाबवर न्यायालयाने दोषारोपपत्र निश्चित केले.२२ जुलै, २००९बुधवार - कसाबचा कबुली जबाब ग्राह्य न धरता न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.२५ नोव्हेंबर, २००९बुधवार - कसाबचे विषप्रयोगाचे आरोप न्यायालयाने फेटाळले.१६ डिसेंबर, २००९बुधवार - सरकारी पक्षाने साक्षी नोंदविण्याचे काम झाल्याचे न्यायालयात सांगितले.३१ मार्च, २०१०बुधवार - कसाबविरुद्ध निकाल जाहीर करण्याचा दिवस न्यायालयाने जाहीर केला.२९ आॅगस्ट, २०१२बुधवार - सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरुद्धचे कसाबचे अपील फेटाळले.२१ नोव्हेंबर, २०१२बुधवार - येरवडा कारागृहात कसाबला फासावर लटकविण्यात आले.

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्ला