Join us  

पुणे आणि जसीडीह दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:08 AM

मुंबई : मध्य रेल्वे पुणे आणि जसीडीह दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सामान्य भाड्यासह सुरू करणार आहे. रेल्वेमंत्री ...

मुंबई : मध्य रेल्वे पुणे आणि जसीडीह दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सामान्य भाड्यासह सुरू करणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जसीडीह - पुणे एक्स्प्रेसला २७ सप्टेंबर रोजी १३.१५ वाजता झेंडा दाखवणार आहेत.

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असून कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. पुण्याहून साप्ताहिक विशेष १ ऑक्टोबरपासून प्रत्येक शुक्रवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि जसीडीह येथे दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. जसीडीह येथून साप्ताहिक विशेष ३ ऑक्टोबरपासून प्रत्येक रविवारी २०.२५ वाजता जसीडीह येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९.४० वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं., सासाराम, गया, किऊल, झाझा या थांब्यावर थांबणार आहे.