‘वजन-काटे’ रामभरोसे!

By Admin | Published: October 15, 2015 02:45 AM2015-10-15T02:45:39+5:302015-10-15T02:45:39+5:30

भाजीपाल्यापासून ते किरणामालापर्यंत रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आपण वजन करून घेतो, ते वजनाचे मशिन योग्य की अयोग्य हे तपासणारी यंत्रणाच ठप्प आहे

'Weight-bite' Rambhosa! | ‘वजन-काटे’ रामभरोसे!

‘वजन-काटे’ रामभरोसे!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, मुंबई
भाजीपाल्यापासून ते किरणामालापर्यंत रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आपण वजन करून घेतो, ते वजनाचे मशिन योग्य की अयोग्य हे तपासणारी यंत्रणाच ठप्प आहे. केवळ २७२ वजनमापे निरीक्षकांवर राज्यभरातील तमाम वजन-काटे तपासण्याची जबाबदारी आहे, शिवाय त्यांच्याकडे तपासणी करणारी अद्ययावत यंत्रेही नाहीत. सगळा कारभार रामभरोसे चालू आहे.
राज्यातील कोकण, मराठवाडा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व पुणे या सहा महसुली विभागांसाठी प्रत्येकी एक व मुंबई मुख्यालयात दोन
अशी आठ उपनियंत्रकांची पदे मंजूर आहेत. त्यातली पाच वर्षानुवर्षे रिक्त आहेत.
तीन सहायक नियंत्रकांना अतिरिक्त पदभार देऊन सहा अधिकाऱ्यांवर राज्याचा कारभार आहे. या सहा जणांना तपासणीच्या कामासाठी गाड्यादेखील नव्हत्या. तेव्हा अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सहा नवीन गाड्या विकत घेऊन दिल्या, पण त्यासाठी पेट्रोल, डिझेलचा खर्च किती व कोणी करायचा, यासाठीची फाईल वित्त विभागात अडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर, बापट यांना हसावे की रडावे? असा प्रश्न पडला. हा विभाग पेट्रोलपंपावर मिळणाऱ्या पेट्रोलच्या मापापासून, विकत घेतल्या जाणाऱ्या पॅकबंद वस्तू, साठवणूक टाक्या, आॅटोरिक्षा मिटर, किराणा दुकानातील वजन-काटे, भाजीवाल्यांकडील वजन-काटे, एवढेच नाही, तर ब्लड प्रेशर मोजण्याचे यंत्र, थर्मामिटर, रक्ताच्या पिशवीत किती मिलीलिटर रक्त आहे, त्याचे पॅकिंग, हॅण्डग्लोव्हज, सर्जिकलसाठीच्या सगळ्या गोष्टी वजन करून किंवा माप करून घेतल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी तपासण्याचे काम करत असताना, त्याची ही अवस्था पाहून मंत्री बापट स्वत:च हादरले.
>> शेजारच्या कर्नाटक, आंध्रात प्रत्येक निरीक्षकाला गाडी आहे, हातात अद्ययावत यंत्रे आहेत. शेतकऱ्यांना आडत दुकानात फसवून, माल विकत घेणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम करणारे मॉयश्चर मिटरही त्या राज्यांकडे आहेत. धान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती आहे, हे मोजण्याचे काम हे यंत्र करते. शिवाय त्यांना स्वतंत्र गणवेश आहेत. त्या शिवाय परदेशात ‘वैधमापन शास्त्र’ विभागात काम करणाऱ्यांना प्रचंड मान असतो. कारण हे अधिकारी तुमच्या रोजच्या जीवन-मरणाशी संबंधित वस्तूंच्या वैधतेबद्दल काम करत असतात. त्यांच्याकडे हायवे वर गाड्यांचा वेग मोजणारी अत्यंत संवेदनशील यंत्रे आहेत, दुधातील पाण्याचे प्रमाण मोजणारी लॅक्टोमिटर्स आहेत, एक्सरेच्या गळतीचे प्रमाण मोजणारे यंत्रही त्या देशांमध्ये आहे.

Web Title: 'Weight-bite' Rambhosa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.