इमानचे वजन आता ३४० किलो

By admin | Published: March 30, 2017 07:14 AM2017-03-30T07:14:21+5:302017-03-30T07:14:21+5:30

इजिप्तच्या इमान अहमदने सहा आठवड्यांत तब्बल १६० किलो वजन घटवले आहे

The weight of faith is now 340 kg | इमानचे वजन आता ३४० किलो

इमानचे वजन आता ३४० किलो

Next

मुंबई : इजिप्तच्या इमान अहमदने सहा आठवड्यांत तब्बल १६० किलो वजन घटवले आहे. इमानचे सध्या वजन ५०० किलोवरून ३४० किलो झाले आहे. जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून इमान अहमद ओळखली जात होती.
इमान अहमदचे जेव्हा भारतात आगमन झाले, त्या वेळी तिचे वजन तब्बल ५०० किलो होते. त्यानंतर डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर आणि डॉक्टरांच्या चमूच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल १६० किलो वजन घटवले आहे. लवकरच इमान इजिप्तला आपल्या घरी परतणार आहे, मात्र इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली. इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे.
इमान अहमदवर ७ मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेपूर्वीत तिच्या आहार आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच वजन घटवले होते. आता पुन्हा डाएट आणि औषधोपचाराद्वारे एकूण १६० किलो वजन घटवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

अमेरिकेतून इमानचा जेनेटिक वैद्यकीय अहवाल मिळाला असून, त्यानुसार इमानच्या मेंदूला माहिती देणाऱ्या ‘लेप्टीन’ हार्मोन्सचा शरीरात अभाव आहे. या माध्यमातून मेंदूला आपल्या भुकेच्या योग्य समतोलाविषयी संदेश दिला जातो़ लेप्टीनच्या अभावामुळे इमानवर अतिस्थूलतेची परिस्थिती ओढावली आहे. सध्या यावर वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही औषध नाही़ काळानंतर यावर उपचार म्हणून शस्त्रक्रियेचा विचार करण्यात येईल.
- डॉ. मुफ्फजल लकडावाला

Web Title: The weight of faith is now 340 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.