‘डाय’ला भारनियमनाचा फटका

By admin | Published: November 12, 2014 10:50 PM2014-11-12T22:50:54+5:302014-11-12T22:50:54+5:30

अलंकार कलाकुसरीने घडविण्यासाठी मुख्य साधन असलेला डाय (साचा) बनविण्याचा डायमेकींग व्यवसाय सकाळ, संध्याकाळच्या भारनियमनामुळे संकटात सापडला आहे.

Weight loss blow to 'Die' | ‘डाय’ला भारनियमनाचा फटका

‘डाय’ला भारनियमनाचा फटका

Next
शौकत शेख ल्ल डहाणू
सौदर्य प्रसाधनातील नेकलेस, मंगळसूत्र, इयरिंग, चेन, ब्रेसलेट, अंगठी हे अलंकार कलाकुसरीने घडविण्यासाठी मुख्य साधन असलेला डाय (साचा) बनविण्याचा डायमेकींग व्यवसाय सकाळ, संध्याकाळच्या भारनियमनामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे पंचवीस ते तीस हजार सुशिक्षित कुशल अकुशल कारागिरांना हातावर हात ठेवून रिकामे बसण्याची वेळ आली आहे. 
या कामगारांची रोजीरोटीही बंद झाली आहे. विशेष म्हणजे डायमेकींग सारख्या या ग्रामोद्योगाला सरकारी धोरण नसल्याने डाय व्यवसाय अनेक अडचणींनी ग्रासला आहे. परिणामी डायव्यवसायाला रामराम ठोकून शेकडो तरूणांनी बोईसर औद्योगिक कारखान्यात नोकरी करण्यास सुरुवात  केली आहे.
डहाणूच्या सागरी किना:यावरील  चिंचणी, तारापुर, वाढवण, गुंगवाडा, ओसार, तणासी, बाडापोखरण, धा. डहाणू, वासगांव, वरोर, इ. पंचवीस गावे तसेच खेडय़ोपाडय़ातील घराघरात डायमेकींग व्यवसाय हस्तकौशल्य आणि अंगमेहनत या भांडवलावर अनेक पिढय़ांपासून सुरू आहे. या व्यवसायामुळे येथील भंडारी, वाडवळ, सोनार, मच्छीमार, गुजराती, माच्छी, आदिवासी, मुस्लीम, बारी या समाजातील हजारो तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालेला आहे. 
सोन्याचे नेकलेस, हार, कानातल्यांच्या डायसाठी चिंचणी तारापूर  येथील डायज्ना मोठी मागणी आहे. येथील डायला राजस्थान, यु. पी., कलकत्ता, बांग्लादेश, 
नेपाळ, भूतान, o्रीलंका, मुंबई, हैद्राबाद, नागपूर, कानपूर, लखनौ, दिल्ली, येथून मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने शेकडो व्यापारी, दलाल तसेच सोने, चांदीचे दुकानदार या परिसरात रोज दिसून येतात. विशेष म्हणजे विशिष्ट आकाराची डाय (साचे) सोबत घेवून जात असत त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही येथील तरूण शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता स्वताचे डायमेकींग व्यवसाय सुरू करत.
हस्तकौशल्यावर आणि प्रचंड मेहनतीवर आधारीत असलेल्या या व्यवसायावर सुमारे पंचवीस तीस हजार कुशल, अकुशल तरूण अवलंबून आहेत. परंतु अधून मधून होणा:या विजेच्या भारनियमनामुळे कामात सातत्य नसल्याने कारागिरांना पुर्णवेळ काम मिळत नाही. 
परिणामी डायमेकींग कारागीर बोईसर एमआयडीसीकडे वळु लागले आहेत. यापुर्वीही वीज महावितरण कंपनीने थकबाकी, वीजचोरी, वीजगळतीचे कारण दाखवून या बंदरपट्टी भागात बारा तासाचे भारनियमन सुरू केले होते. 
त्यावेळी माजी आदीवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शेकडो ग्रामस्थांची लाखोची थकबाकी स्वत:ने भरली होती. शिवाय अनेक गोरगरीबांना नवीन मीटर देण्यासाठी महावितरणला लाखो रू. भरले होते. त्यावेळी भारनियमन बंद झाले होते. सध्या मात्र, दोन तीन महिन्यापासून बंदरपट्टी भागात भारनियमन सुरू आहे त्यामुळे असंख्य गावात काळोख पसरला आहे. आणि डायमेकिंग व्यवसायही अंधारात आहे. 

 

Web Title: Weight loss blow to 'Die'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.