Welcome 2019 : झिंग, चित्कार आणि जल्लोषात नववर्षाचे जगभरात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 12:11 AM2019-01-01T00:11:12+5:302019-01-01T06:55:22+5:30

सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019चे स्वागत करण्यात आले आहे. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 

Welcome 2019: Happy New Year welcome | Welcome 2019 : झिंग, चित्कार आणि जल्लोषात नववर्षाचे जगभरात स्वागत

Welcome 2019 : झिंग, चित्कार आणि जल्लोषात नववर्षाचे जगभरात स्वागत

Next

मुंबई : मित्रमंडळी, वेगवेगळ्या ग्रूपच्या संगतीने सोसायट्यांच्या गच्चीवर, हॉटेलांत, रिसॉर्ट, मॉल, फार्म हाऊसवर नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019चे स्वागत करण्यात आले आहे.

मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.  आनंदाची झिंग, उत्साहाला आलेले फसफसते उधाण आणि सर्वत्र सुरू असलेल्या जल्लोषात पहाटेपर्यंत अनेकांनी धिंगाणा घातला.

मध्यरात्री बाराच्या ठोक्याला झालेली आतषबाजी, फटाक्यांचे आवाज, चर्चमधील बेल, गाड्यांचे हॉर्न, रस्तोरस्ती फिरणाऱ्या, समुद्रकिनारी गर्दी केलेल्या जमावांनी केलेला चित्कार यातूनच नव्या वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली... आणि सुरू झाला शुभेच्छांचा वर्षाव.
नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रात्रभर पार्टीचे प्लॅन हॉटेल, पबमध्ये केले होते. त्यामुळे सर्वत्र गर्दी होती.

मुंबईत मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट, वांद्रे सी-लिंक, वरळी सी-लिंक, गेट वे आॅफ इंडिया यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडेही मोठ्या प्रमाणात नागरिक वळले होते. काहींनी नवीन वर्ष सुखाचे जावे यासाठी मंदिरात रांगा लावल्या. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर आदी मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांत गर्दी होती. सध्या सर्वत्र बोच-या थंडीचे वातावरण आहे. त्यात नागरिक मनसोक्त आनंदात रमून गेले. मुंबईतील प्रत्येक चौपाटीवर नागरिकांनी सेलीब्रेशन केले. सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईसह इतर शहरांमधून नागरिक मुंबईच्या चौपाटीवर फिरायला आले होते. नववर्षानिमित्त वेलकम २०१९, गुडबाय २०१८ अशा आशयाचे केकही तयार केले गेले होते.

याचबरोबर, जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 

सोशल मीडियावर फिव्हर
मध्यरात्री बारा वाजताच मोबाइलवर शुभेच्छांचा महापूर सुरू झाला. प्रत्येकाने नवीन वर्ष सुख-समाधानाचे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवर न्यू ईअरचे फोटो टाकण्यात आले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. मजकूर, फोटो, जीफ फाइलचा वापर झाला. अनेकांनी नवीन वर्षाच्या संकल्पाच्या पोस्ट टाकत फेसबुकच्या भिंती रंगवल्या.



















 

Web Title: Welcome 2019: Happy New Year welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.