कलेतून बाप्पाचे स्वागत!

By admin | Published: September 11, 2016 03:08 AM2016-09-11T03:08:26+5:302016-09-11T03:08:26+5:30

विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धिदेवता संकटहारी श्रीगणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात. प्रसन्न वातावरण, ढोल-ताशांचा गजर, आरती, अभंग, मंत्रोच्चाराचे पवित्र मंगलमय स्वर

Welcome to the art gallery! | कलेतून बाप्पाचे स्वागत!

कलेतून बाप्पाचे स्वागत!

Next

मुंबई: विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धिदेवता संकटहारी श्रीगणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात. प्रसन्न वातावरण, ढोल-ताशांचा गजर, आरती, अभंग, मंत्रोच्चाराचे पवित्र मंगलमय स्वर, विविध फुलांची सुवासिक दरवळ, प्रसादाचा गोड सुवास, सर्वकाही चैतन्यमय, शाश्वत, देखणा, मोहवणारा हा उत्सव म्हणजे, चराचरातून चेतना जागविणारा आकंठ चिरस्मरणीय असा हा सोहळा.
हा सोहळा ‘कलर्स’ आणि ‘लोकमत सखी मंच’ प्रस्तुत ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथे साजरा होत आहे. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रम १२ सप्टेंबर रोजी दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी, राजा शिवाजी विद्यालयाच्या बी.एन. वैद्य सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणार आहे. खरे सांगायचे, तर भक्तीचे अनेक रंग स्पर्धांद्वारे ‘कलर्स’ आणि ‘लोकमत सखी मंच’ घेऊन येत आहे. गेल्या वर्षभर कलर्स चॅनेलने सखींसाठी विविध उपक्रम राबविले आणि ते संपूर्ण स्तरावर पसंतदेखील केले गेले. कलर्स चॅनेल म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय प्रीमियम हिंदी जनरल एंटरटेन्मेंट चॅनल आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदा असे कार्यक्रम कलर्सने आणले आहेत, जे वेगळे आहेत आणि मनाला भावणारे आहेत. प्रत्येक मालिकेचे कथानक असे होते, ज्यांच्यामध्ये ताकद होती, जुन्या बुरसटलेल्या रूढी-परंपरेविरुद्ध जाब विचारण्याची, फिक्शन शोपासून तर फॉरमॅट शो, रिअ‍ॅलिटी शोपासून तर ब्लॉक बस्टर चित्रपट, सदैव विविध शो आणि कार्यक्रमांनी भरलेला
भरगच्च नजराणा प्रेक्षकांसाठी कायम हजर.
कलर्सचे नागिन २, शनी, दिव्यांशी आणि बिग बॉस हे आगामी आकर्षण आहे. तेव्हा मनोरंजनाची धमाल करण्यासाठी तयार राहा आणि या उत्सवात सामील व्हा. विजेत्या सखींना कलर्सतर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात येतील. कार्यक्रम व स्पर्धा सर्वांसाठी नि:शुल्क आणि खुली. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ८६५२२००२२१, ९८३३८६९२२३. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to the art gallery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.