Join us  

स्वागत नववर्षाचे...

By admin | Published: March 28, 2017 6:34 AM

मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजली आहे़ प्रत्येक दारात नटून उभी असलेली गुढी, संस्कृती व परंपरेचा साज

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांमध्ये चढाओढ लागली आहे. घरासोबत एसी, चारचाकी किंवा दुचाकी गाड्या आणि सोने-चांदीची नाणी मोफत देण्याची चढाओढच विकासकांमध्ये लागली आहे. विकासकांच्या या आॅफर्सच्या भडिमारामुळे ग्राहकराजा मात्र पुरता चक्रावल्याचे दिसत आहे.नोटाबंदीनंतर ब्रेक लागलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अच्छे दिन येण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळेच गेल्या चार महिन्यांपासून थंडावलेल्या रिअल इस्टेटचा बाजार गुढीपाडव्याला भलताच गरम दिसत आहे. अवघ्या सात लाख रुपयांपासून घराच्या किमतींना सुरुवात होत असून, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा विकासकांचा मानस दिसत आहे. वन रूम किचनपासून वन बीएचके आणि टू बीएचके घरांच्या सर्वाधिक जाहिराती प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर झळकत आहेत. एकही पैसा न भरता घराची बुकिंग करून घेतली जात असून, सुलभ हफ्त्यांची व्यवस्थाही विकासक करत आहेत. (प्रतिनिधी) मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजली आहे़ प्रत्येक दारात नटून उभी असलेली गुढी, संस्कृती व परंपरेचा साज असलेल्या शोभायात्रा, ढोल-ताशांचा गजर, चित्ररथांचे आकर्षण, गं्रथ दिंडी, घराघरांत बनवलेले गोडधोड.. अशा मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत़ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या पाडव्याला घर, वाहन व सोने खरेदीला उधाण आले़ आगाऊ वाहन खरेदी केल्याने ठिकठिकाणी वाहनांची पूजा होईल़ फसवणुकीपासून सावध राहाकमी रकमेत मिळणाऱ्या घरांचे आमिष दाखवून काही बनावट कंपन्यांकडून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार अशावेळी सर्वाधिक घडतात. त्यामुळे संपूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतीही रक्कम भरण्याची घाई ग्राहकांनी करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. गिरणगावात रंगला पालखी सोहळाहिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिरणगावातील घोडपदेव परिसरात रंगलेल्या पालखी सोहळ्याने गुढीपाडव्याला चार चाँद लावले. गुढीपाडव्याची तयारी रंगात असताना सोमवारी सायंकाळी गिरणगावात निघालेल्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीची झलक दाखवली. घोडपदेवमधील ग्रामदैवत श्री कापरेश्वर महाराज यांचा हा पालखी सोहळा गेल्या ६४ वर्षांपासून निरंतर सुरू आहे.भायखळा पूर्वेकडील घोडपदेवमध्ये सायंकाळी कापरेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यात भायखळ्यासह माझगाव, रे रोड, कॉटनग्रीन, चिंचपोकळी, काळाचौकी या मराठीबहुल भागांतील भाविकांनी गर्दी केली होती. तर काही कारणास्तव नवी मुंबई आणि ठाणे परिसरात स्थलांतरित झालेले भाविकही या वेळी आवर्जून उपस्थित दिसत होते. लेजीम पथकाला साथ देण्यासाठी या ठिकाणी डीजेचा दणदणाट दिसला. येथील डी.पी. वाडी परिसरातील जय कापरेश्वर ग्रुपतर्फे भाविकांना मोफत सरबत आणि लाडू वाटप करण्यात आले. तर पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानने रामभाऊ भोगले मार्गावर महाआरती करत भाविकांना खिळवून ठेवले. हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शनहिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला मुंबई विद्यापीठातील १६ विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरमधून मुंबईची सैर करता येणार आहे. मुंबईचे विहंगमदृश्य टिपण्याचा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधून हवाई दर्शनासाठी हेलिकॉप्टर हवेत भरारी घेणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले. पवनहंस आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पवनहंसकडून एक हेलिकॉप्टर मंगळवारी पाठवण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरमधून १६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवास घडवून आणण्यात येणार आहे. या १६ विद्यार्थ्यांमध्ये कल्याण आणि कर्जतच्या पुढच्या आणि तर भार्इंदर आणि रायगडपुढील विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी अशा एकूण १६ विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरमधून मोफत दर्शन मिळणार आहे. कलिना कॅम्पसमध्ये हेलिपॅड उभारले आहे. बॉम्बे फ्लार्इंग क्लबबरोबर सुरू असलेल्या वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी पालघर येथे धावपट्टी उभारण्याचा विद्यापीठाचा विचार सुरू आहे. धावपट्टी उभारण्यासाठी राज्य सरकारकडे २०० एकर जागा मागण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. वैमानिकांना प्रशिक्षणासाठी जुने विमान मिळू शकते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अभ्यासक्रमातून व्यावसायिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. व्यावसायभिमुख शिक्षणासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन येथे बीएससी एअरोनॉटिक्स आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग हा द्विपदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातर्फे बीएससी एअरोनॉटिक्स आणि पवनहंसतर्फे एअरक्राफ्ट मेंटेनन्स अशा दोन पदव्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत. १२ वीनंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून, तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मर्यादित म्हणजे ६० विद्यार्थीसंख्या ठेवण्यात आली आहे.