Join us  

ठाण्यासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात

By admin | Published: March 21, 2015 10:47 PM

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. ठाण्यात ४० हून अधिक चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले.

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. ठाण्यात ४० हून अधिक चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले. डोंबिवलीचा फडके रोड हा पहाटेपासूनच गजबजलेला होता. विविध आशयांचे चित्ररथ, समाजजागृती करण्याचे संदेश देत दिंडीच्या माध्यमातून, पारंपरिक पोशाखांसह ढोलताशांच्या गजरात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडीसह ग्रामीण भागांत सुमारे ४० हून अधिक स्वागतयात्रा काढण्यात आल्या होत्या. स्वच्छ भारत, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, भ्रष्टाचार निर्मूलन, जलसाक्षरता, योग साक्षरता, सामाजिक समरसता आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण आदी विषयांवर आधारित चित्ररथांतून समाजभान जपण्याचा संदेश देऊन ठाण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या पुढाकाराने या स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. चौकाचौकांत ढोलताशे पथके आणि रांगोळीने या स्वागतयात्रेचे व कौपिनेश्वर देवाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापौर संजय मोरे, सभागृहनेते नरेश म्हस्के, स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष श्रीकांत नेर्लेकर व शहरातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींच्या सहभागाने नववर्ष स्वागतयात्रेची भव्य मिरवणूक जांभळी नाका येथून निघाली. भ्रष्टाचार निर्मूलन, महिला सबलीकरण, स्वच्छता अभियान, महिला स्वयंसंरक्षण, संत माहात्म्य, गीत माहात्म्य, योग प्रशिक्षण, जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक असे विविध विषय या स्वागतयात्रेत हाताळण्यात आले. साईबाबांची पालखी, त्याचबरोबर सध्याची लोकप्रिय मालिका असलेल्या खंडोबाचे दर्शनही नववर्ष स्वागतयात्रेत झाले. त्याचबरोबर महानगरपालिकेतील प्रदूषण नियंत्रण कक्ष, ठाणे परिवहन उपक्र म, पाणीपुरवठा विभाग अशा अनेक विभागांनीदेखील विविध विषयांवर जागृती करणारे चित्ररथ स्वागतयात्रेत साकारले होते.विविध चौकांत होणारी पुष्पवृष्टी व ढोलताशांच्या पथकांमुळे संपूर्ण स्वागतयात्रेच्या मार्गावर प्रसन्न असे वातावरण होते. यंदा ७ ढोलताशा पथकांनी नववर्ष स्वागतयात्रेत आपला सहभाग नोंदवला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सवाचे आयोजन केले होते. कचराळी तलाव भागातही यंदा प्रथमच दीपोत्सवाचे आयोजन केले होते. तलावाभोवती लावलेल्या दीपांनी संपूर्ण तलाव परिसर उजळून निघाला.घर तेथे कडुनिंब फांगणे जि.प. शाळेचा उपक्र मशिरोशी : मुरबाड तालुक्यातील फांगणे जि.प. शाळा यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्याला कुडुनिंबाच्या झाडाचे महत्त्व समजावून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री जि.प. फांगणे शाळा यांनी गुडीपाडव्याचे औचित्य साधून कडुनिंबाचे झाड गावातील प्रत्येकाला भेट दिले. वासिंदला शोभायात्रावासिंद : बाजारपेठेत शोभायात्रा काढून, विविध वेशभूषा परिधान करून लेझीम, इतर उपक्रम राबवून नागरिकांनी आनंदोत्सवाच्या गुढी उभारल्या.फळेगावात ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषटिटवाळा : यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा- तुकोबाचा जयघोष, टाळमृदंगांच्या नादात स्वागतयात्रा काढण्यात आली.ग्रामीण भागातही शोभायात्रेचा कार्यक्र मकाल्हेर : स्वागतयात्रेत चित्ररथ, लेझीम पथके, ढोल पथकांसह हिंदू आपल्या पारंपरिक वेशभूषांचे प्रदर्शन करण्यात आले होते. कुडूसची मराठमोळी शोभायात्राकुडूस : व्यापारी, समाजसेवक व विविध मंडळांच्या सहकार्याने शोभायात्रेचे नियोजन केल्याने या गुढीपाडवा शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सर्व सहभागी झाले.शहापुरात जल्लोषडोळखांब : काही वर्षांपासून सुरू असलेल्या नववर्ष स्वागतयात्रेचे या वर्षीही शहापुरात आयोजन करण्यात आले होते. बैलगाड्या, रथ, महिलांची मोटारसायकल फेरी, लेझीम पथक, भजनी महिला पथके यांच्यासह हजारो स्त्री-पुरु ष या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते या स्वागतयात्रेत ठळकपणे उठून दिसत होते. ६३ सामाजिक संस्थांसह ५ हजारांहून अधिक नागरिकांची डोंबिवलीतील स्वागतयात्रेला गर्दीडोंबिवली : श्री गणेश मंदिर संस्थानच्या मार्गदर्शनाखाली स्वागतयात्रेला शनिवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. त्यामध्ये ६३ सामाजिक संस्थांसह लहानांपासून अबालवृद्धापर्यंतच्या पाच हजारांहून अधिक डोंबिवलीकरांनी सहभागी होऊन हिंदू नववर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध उपक्रमांचे संयोजन महिलावर्गाने केले, हेदेखील यंदाचे वैशिष्ट्य. चित्ररथांसाठी महिला सक्षमीकरण आणि स्वच्छ सुंदर परिसर यासारखे विषय निवडण्यात आले होते़ त्यात तब्बल ६३ सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर साहाय्यासाठी सहसंयोजक म्हणून निवडक अनुभवी तरुण मंडळींनी यात्रेचे नेतृत्व केले. अंबरनाथमध्ये स्वागतयात्रेत पृथ्वी वाचवा संदेशअंबरनाथ : गुढीपाडव्यानिमित्त अंबरनाथमध्ये नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे स्वागतयात्रा काढण्यात आली होती. पूर्व आणि पश्चिमेकडून उपयात्रा काढण्यात आल्या. पूर्वेकडील शिवमंदिर येथून जलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. हेरंब मंदिराजवळून मुख्य यात्रेला सुरु वात करण्यात आली. शिवाजी चौकात गुढी उभारून हुतात्मा चौकात आली तेथे समारोप करण्यात आला. बदलापूरमध्ये उत्साहात झाले नववर्षाचे स्वागत...बदलापूर : पारंपरिक वेशातील स्त्रिया व पुरु ष तसेच उत्साहाने ओसंडून वाहणारी तरु णाई असे चित्र या यात्रेत दिसत होते. महिलांचे लेझीम पथक, तलवार पथक, गुढी पथक तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे आकर्षणाचे विषय ठरले. भिवंडीत चार शोभायात्राभिवंडी : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चार शोभायात्रा उत्साहात व आनंदात संपन्न झाल्या. पारंपरिक वेशांत महिलांनी व तरुणांनी मराठमोळ्या व हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविले. लेझीम पथक हे शोभायात्रेचे खास आकर्षण होते. दादासाहेब दांडेकर विद्यालयाने लहान मुलांचे लेझीम पथक उभारले होते.