Join us

‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’चे मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:55 AM

बर्सिलोना येथे गेल्या महिन्यात जलावतरण करण्यात आलेल्या रॉयल कॅरिबिअन इंटरनॅशनलच्या ‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ या जहाजाचे मुंबई बंदरावर गुरुवारी आगमन झाले.

मुंबई : बर्सिलोना येथे गेल्या महिन्यात जलावतरण करण्यात आलेल्या रॉयल कॅरिबिअन इंटरनॅशनलच्या ‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ या जहाजाचे मुंबई बंदरावर गुरुवारी आगमन झाले. येथून हे जहाज सिंगापूरसाठी रवाना झाले. सकाळी ६ वाजता आलेल्या या जहाजाचे व त्यातील प्रवाशांचे मराठमोळ्या पद्धतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.दुबई येथून सिंगापूर असा प्रवास करणाऱ्या या जहाजाने गुरुवारी सकाळी मुंबईतील पहिला थांबा घेतला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पुढील प्रवासासाठी ते कोचिनला रवाना झाले. या जहाजाद्वारे दुबई ते सिंगापूरदरम्यान १८ रात्रींचा प्रवास करण्यात येणार आहे. या १६ मजली भव्य जहाजाचे वजन १ लाख ८६ हजार ६६६ टन आहे. कॅप्टन चार्ल्स टेग यांच्या नेतृत्वाखाली हे जहाज सागरी सेवेत रुजू झाले आहे. जहाजाच्या आगमनाप्रसंगी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, जेएम बक्षीचे वरिष्ठ उपाध्यक्ष केकी मास्टर, रॉयल कॅरिबिअनच्या व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅन्गी स्टीफन, टायरनच्या अध्यक्षा रत्ना चढ्डा व सीईओ वरुण चढ्डा यांच्यासह पर्यटन अधिकारी उपस्थित होते.‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ या जहाजाचे मुख्य आकर्षण म्हणजे १६ मजल्यांच्या या जहाजावर पर्यटकांसाठी विविध अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ हे भारतीय किनाºयावर थांबणारे सर्वांत मोठे जहाज आहे. हे जहाज मे महिन्यात सिंगापूर येथे व जूननंतर शांघाईमध्ये असेल. त्यामुळे भारतीय प्रवाशांना थायलंड, मलेशिया आणि जपानमधील प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देता येईल, असे वरुण चढ्डा यांनी सांगितले.जहाजाची वैशिष्ट्येजर्मनीतील मेयर पेपेनबर्गमध्ये जहाजाची बांधणी करण्यात आली आहे. जहातात एकूण १६ मजले. १४ मजल्यांचा वापर प्रवाशांसाठी, २ हजार १३७ कर्मचारी निवासी खोल्या. तर जहाजाची रुंदी १३६ फूट, लांबी १ हजार १३९ फूट इतकी आहे.रॉक क्लार्इंबिंग वॉल, स्पोर्ट्स कोर्ट, १ आउटडोअर पूल, २ इनडोअर पूल, कॅसिनो रॉयल, रॉयल थिएटर, व्हिडीओ आर्केड, फिटनेस सेंटर, तरुणाईसाठी अ‍ॅडव्हेंचर ओशिएन युथ एरिआ आदी सुविधा उपलब्ध.

टॅग्स :महाराष्ट्र