जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 09:45 AM2023-01-01T09:45:15+5:302023-01-01T09:45:48+5:30

कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात झाले.

Welcome to Jollosh!, Farewell of Mumbaikars to the new year | जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

Next

मुंबई : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नववर्षाचे उत्साहात स्वागत करता न आल्याने मुंबईकरांनी ही कसर यंदा भरून काढली. सरत्या वर्षाला हसत खेळत निरोप देत मुंबईकरांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. कुणी गेटवे ऑफ इंडिया तर कुणी मरीन लाइन्सला थर्टी फर्स्टची नाइट 
इन्जॉय केली. तर काही मुंबईकरांनी देवदर्शन करून नवीन वर्षाची सुरुवात केली.
कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात झाले. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही दिवस अगोदरपासूनच कॉलेज गोअर्स तरुणांचे नियोजन सुरू होते. शनिवारी सायंकाळी सहापासूनच हॉटेल, रेस्टॉरंटकडे तरुणांची पावले वळू लागली. यामुळे मुंबईतील हॉटेलात मोठ्या प्रमाणात गर्दी 
जमली होती. कुटुंबासह अनेकांनी शाकाहारी, मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला तर अनेकांनी मित्रांसह जल्लोष केला.
चौपट्यांवर तरुणाई बेधुंद
थंडगार वारा, समुद्राच्या फेसळत्या लाटा अंगावर झेलत तरुणांनी थर्टी फर्स्ट साजरा केला. जुहू चौपाटी, मरीन लाइन्स यासह वरळी सी फेस आणि गेट वे ऑफ इंडियावर मुंबईकरांनी गर्दी केली होती.

रंगीबेरंगी रोषणाई
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम, दुकाने, सोसायटीच्या इमारती यासह घरांनाही रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली होती तर अनेकांनी घरात अथवा सोसायटीतच पार्टीचा बेत आखला.

सिद्धिविनायकाचे दर्शन
थर्टी फर्स्टच्या जल्लोषानंतर मुंबईकरांनी वर्षाचा पहिला दिवस देव दर्शनाने सुरू व्हावा यासाठी सिद्धिविनायकाच्या मंदिरात रांग लावली होती. दर्शनासाठी पहाटे मंदिर सुरू झाल्यानंतर अनेकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवत नवीन वर्षाची सुरुवात केली.

लोकल, बेस्टची सोय
मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे तसेच बेस्टने शनिवारी रात्री अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. मुंबईत रात्री फेरफटका मारल्यानंतर लोकल, बेस्टमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

डबलडेकर जोरात
बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर बस असून शनिवारी रात्री या बस मुंबईतील ऐतिहासिक स्थळांवरून धावत होती. काही मुंबईकरांनी या बसमधून थर्टी फर्स्ट साजरा केला. तसेच उगवत्या सूर्याचे दर्शनही डबलडेकरच्या निलांबरी बसमधून घेण्यात आले.

Web Title: Welcome to Jollosh!, Farewell of Mumbaikars to the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.