सलमान खान धमकी प्रकरणात कर्नाटकातून वेल्डरला अटक, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने फॅशन डिझायनरलाही दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:30 AM2024-11-07T08:30:50+5:302024-11-07T08:31:12+5:30

Mumbai News: वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संदेश पाठवून, अभिनेता सलमान खानला धमकावत पाच  कोटींची मागणी प्रकरणात वरळी पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली आहे. भिकाराम जलाराम बिश्नाेई उर्फ विक्रम, असे आरोपीचे नाव असून, तो स्टील वेल्डिंगचे काम करतो. 

Welder arrested from Karnataka in Salman Khan threat case, fashion designer in the name of Lawrence Bishnoi was also threatened | सलमान खान धमकी प्रकरणात कर्नाटकातून वेल्डरला अटक, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने फॅशन डिझायनरलाही दिली होती धमकी

सलमान खान धमकी प्रकरणात कर्नाटकातून वेल्डरला अटक, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने फॅशन डिझायनरलाही दिली होती धमकी

 मुंबई - वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संदेश पाठवून, अभिनेता सलमान खानला धमकावत पाच  कोटींची मागणी प्रकरणात वरळी पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली आहे. भिकाराम जलाराम बिश्नाेई उर्फ विक्रम, असे आरोपीचे नाव असून, तो स्टील वेल्डिंगचे काम करतो. 

वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री व्हॉट्सॲपद्वारे धमकीचा हा संदेश आला. संदेशात, ‘मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे, सलमानला जर जिवंत राहायचे असेल, तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. पाच कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रिय आहे, असे सांगण्यात आले होते. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. 

तोही ‘बिश्नोई’
तांत्रिक तपासादरम्यान भिकारामनेच संदेश केल्याचे स्पष्ट होताच पथकाने कर्नाटकमधून ताब्यात घेत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तोही बिश्नाेई समाजाचा असून, सलमानविरोधात असलेल्या रागातून त्याने हा संदेश पाठवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले.  

शिवडीतही गुन्हा दाखल
बिश्नोई टोळीचे नाव वापरून माझगावमधील फॅशन डिझायनरला धमकवल्याचा प्रकार सामोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून शिवडी पोलिस अधिक तपास करत आहेत. 
नवाब टँक रोड परिसरात राहत असलेल्या ४२ वर्षीय फिर्यादी या फॅशन डिजायनर आहेत. आरोपीने त्यांना कॉल करून बिश्नोई टोळीकडून बोलत असल्याचे सांगून अपूर्वी यांचे ५५ लाख रुपये परत कर, ७ दिन का टाईम देता हैं, हमारे चक्कर मे ना पड, फॅमिलीवाला बंदा हैना, तेरी जान की पर्वा नही हैं क्या, कल अपूर्वी से बात कर’, अशी धमकी दिली.

Web Title: Welder arrested from Karnataka in Salman Khan threat case, fashion designer in the name of Lawrence Bishnoi was also threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.