Join us  

"उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो"; एकनाथ शिेंदेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 9:50 PM

Eknath Shinde : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली.

Eknath Shinde ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 'एएनआय' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे गौप्यस्फोट केले. 

महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी केलेल्या बंडावर भाष्य केले. दोन वर्षापूर्वी गुवाहाटीला जात असताना आपण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो असल्याचा गौप्यस्फोट केला. आम्ही गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती, असंही शिंदे म्हणाले. मी  लपून छपून गुवाहाटीला गेलो नाही, मी खुलेआमपणे गुवाहाटीला गेलो. मी फोनवर बोलत-बोलत गेलो. उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मी रस्त्यात होतो. मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला खूप आव्हान दिलं होतं की, परत येऊन दाखवा. लाखो लोक रस्त्यावर येणार, रस्ता जाम करणार. आमदारांना विधानसभेत जाऊ देणार नाही, अशा धमक्याही आम्हाला त्यांनी दिल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. ज्याने पक्षासाठी दिवसरात्र काम केलं आहे त्याला तुम्ही घाबरवत आहात, मी घाबरणाऱ्यांमधील नाही, असंही सीएम एकनाथ शिंदे म्हणाले.  

गृहविभागात भ्रष्टाचार उघडपणे सुरूच होता

अनिल देशमुख गृहमंत्री असताना भ्रष्टाचार उघडपणे सुरू होता. मी हे मुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही सांगितले होते. गृह विभाग हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारा विभाग आहे. मात्र तो भ्रष्टाचार सुरूच होता त्याची भरपाई देशमुखांना करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना बोलायला हवं होते. आमचे कार्यकर्ते जेलला जात होते. आमदारांना मतदारसंघात काम करता येत नव्हते. विचारधारेला फटका बसत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काही बोलले त्यावेळी मौन बाळगावं लागत होते. आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे करत असलो तरी दुसऱ्या धर्म जातीचा अपमान केला नाही. मात्र आमच्या विचारधारेला तोडमोड करण्याचं काम मविआत होत होते. त्यामुळे आमदार चिंतेत होते. शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे