Join us

मागाठाणे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुपडे पालटणार; सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 28, 2024 5:34 PM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान समोरील पश्चिम द्रुतगती महामार्ग पूलाखालील सौदर्यीकरण करण्यात येणार असल्याने या परिसराचे रुपडे पालटणार आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : मागाठाणे प्रभाग क्रमांक 11, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान समोरील पश्चिम द्रुतगती महामार्ग पूलाखालील सौदर्यीकरण करण्यात येणार असल्याने या परिसराचे रुपडे पालटणार आहे. येथील सौदर्यीकरणात पर्यटक व पादचाऱ्यांसाठी पायवाट, उड्डाणपूलाखाली शोभिवंत अशा स्ट्रीट फर्निचरची व्यवस्था, वन्य प्राण्यांवर आधारित शिल्प चित्रे,अँपि एरीयाची व्यवस्था अशा विविध कामांचा अंतर्भाव आहे.

शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांनी आणि मुंबई महानगर पालिकेतर्फे सदर सौदर्यीकरण करण्यात येणार असून या कामाचे त्यांच्या हस्ते करण्यात आले. 

सदर सौंदर्यकरणाच्या कामासाठी एकूण बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सदर सौंदर्यकाळामुळे येथील संपूर्ण परिसर स्वच्छ आणि पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून विकसित होईल असा विश्वास आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला.

यावेळी महिला विभागप्रमुख मीना पानमंद, विधानसभा संघटक मनीषा सावंत, उपविभागप्रमुख  राजेश कासार शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर,विधानसभा संघटक सुभाष येरुणकर, अमोल विश्वासराव, अशोक यादव,महिला शाखाप्रमुख समीना माहिमकर, सुवर्णा गवस  आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईनगर पालिका