वेस्टर्न....बोरीवलीत तरु णाचा जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: December 3, 2014 10:35 PM2014-12-03T22:35:42+5:302014-12-03T22:35:42+5:30
बोरीवलीत तरु णाचा जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न
Next
ब रीवलीत तरु णाचा जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्नबोरीवली: बोरीवली पश्चिम येथील एक्सर रोडच्या रॉक कॉलेजजवळ एका १९ वर्षाच्या तरु णाने स्वत:वर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. सिधू वाली असे या तरुणाचे नाव असून तो एका खाजगी बस कंपनीत क्लीनरचे काम करत असे. सध्या त्याच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत तो ८० टक्के भाजला आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तो गंभीर जखमी असल्याने त्याचा जबाब नोंदविता आलेला नसल्याची माहिती एमएचबी पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्या पालकांचा जवाब नोंदविला असून घटनेपूर्वी त्याने परिवारासोबत जेवण केले होते. मात्र त्याच्याशी कोणाशी भांडण झाले नसल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले.