Join us

वेस्टर्न...बोरिवली चिमुरडीच्या हत्येप्रकरणी संशयिताचे रेखाचित्र

By admin | Published: September 01, 2014 9:34 PM

वेस्टर्न....

वेस्टर्न....

बोरिवली चिमुरडीच्या हत्येप्रकरणी संशयिताचे रेखाचित्र

बोरिवली: बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कच्या पूलाखाली रविवारी सापडलेल्या चिमुरडीच्या मृतदेहाच्या तपासाकरिता पोलिसांनी आत्तापर्यंत तब्बल ७० जणांची चौकशी केली असून एका संशयिताचे रेखाचित्र बनवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरासमोरील उड्डाणपुलाखाली मृत चिमुरडी आई-र्वडिलांसोबत राहत होती. शवविच्छेदन अहवालात या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच तिच्या गळ्यावर जखमांची नोंद देखील अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अत्यंत क्रूर अशा घटनेनंतर पोलिसांनी युध्द पातळीवर तपास मोहिम हाती घेतली आहे. तपासासाठी सहा विशेष पथके देखील तयार करण्यात आली आहेत. तसेच याप्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्ष १२ कडे सोपवण्यात आला आहे. परिसरातील गर्दुल्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. चिमुरडीच्या बहिणीने दिलेल्या माहितीवरून संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. या चिमुरडीची हत्येची आणखी काही कारणे आहेत का, या दिशेनेही तपास सुरु असल्याचे कस्तुरबा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितले. चिंतेची बाब म्हणजे घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. गेल्या महिन्यांत कांदिवली येथेही रस्त्यावर झोपलेल्या सहा वर्षांच्या मुलीला पळवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, त्यातील आरोपीचे फुटेज शेजारील इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो प्रकार उघडकीस आला होता. (प्रतिनिधी)