मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी जेथे मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेट्स लवकरच काढण्यात येतील. आतापर्यंत ६० टक्के बॅरिकेट्स काढण्यात आले असून, उर्वरित बॅरिकेट्सही मार्च २०१९पर्यंत काढण्यात येतील. त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होईल, असे आश्वासन मेट्रोचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिले.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. या त्रासाबाबत राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी आर.टी.ओ. कार्यालयात बैठक बोलावली होती. या वेळी जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडलेल्या पुलाचा विस्तार वेरावलीपर्यंत करण्यासाठी निधी असताना निव्वळ मेट्रोच्या कामामुळे या कामाला विलंब होत असल्याचे त्यांनी मेट्रोच्या अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.अंधेरीतील भुयारी मार्ग लवकरच!च्पारसी पंचायत येथील भुयारी मार्गाचे काम सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. तसेच अंधेरी येथील भुयारी मार्गाचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती दराडे यांनी दिली. त्याचप्रमाणे मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जेथे लाईट नाही, तेथे दोन दिवसांमध्ये फ्लड लाईट लावण्यात येतील. त्याचबरोबर जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा वेरावलीपर्यंत विस्तार करण्यासाठी टाकण्यात येणाºया मेट्रो आणि फ्लायओवरच्या एकाच पिलरचे काम पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही दराडे यांनी या वेळी दिली.