Join us  

वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प; मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 11:27 AM

नलॉक १ च्या पहिल्याच दिवशी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा घोषित  करण्यात आले होते . पण सोमवार पासून खाजगी कार्यालय १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनलॉक १ च्या पहिल्याच दिवशी अनेकजण आपली वाहने घेऊन घराबाहेर पडले. त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे वर बांद्रा,कांदिवली दहिसर भागात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

तसेच अनलॉक १ च्या पहिल्याच दिवशी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली. कल्याणहून सुटलेल्या लोकलमध्ये एका सीटवर एकच पाहिजे असा नियम असताना उभ्याने प्रवास केला जात आहे. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स कसे ठेवायचे, असा सवाल त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला. या गाडी मध्ये कॉन्ट्रॅक्टरची माणसे आहेत. तसेच बाहेरील माणसे सुध्दा चढतात. कोणी चेक करायला सुध्दा येत नाही. याची दखल घ्यावी, असेही रेल्वे कर्मचारी सांगत आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 1: कोरोनाच्या दहशतीत कार्यालये उघडण्याचा पहिला दिवस; मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी

Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत

UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसवाहतूक कोंडी