पश्चिम द्रुतगती मार्गाची सुटणार वाहतूककोंडी; आकुर्ली अंडरपासचे काम पूर्ण; रस्ता वाहतुकीसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:49 AM2024-09-12T06:49:11+5:302024-09-12T06:50:04+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नव्याने तयार करण्यात येत असलेल्या आकुर्ली अंडरपासचे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण आले आहे

Western Expressway to ease traffic congestion; Akurli Underpass work completed; Road open to traffic | पश्चिम द्रुतगती मार्गाची सुटणार वाहतूककोंडी; आकुर्ली अंडरपासचे काम पूर्ण; रस्ता वाहतुकीसाठी खुला

पश्चिम द्रुतगती मार्गाची सुटणार वाहतूककोंडी; आकुर्ली अंडरपासचे काम पूर्ण; रस्ता वाहतुकीसाठी खुला

मुंबई - पश्चिम द्रुतगती लगती मार्गावर आकुर्ली भागातील अंडरपासच्या कामामुळे होणान्या वाहतूक कोंडीतून आता प्रयातांची सुटका होणार आहे. त्यातून वा भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागणार नाही, बोरीवली आणि गोरेगाव दिशेला प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कांदिवली रेल्वे स्टेशन ते लोखंडवाला परिसराकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उभारण्यात येत असलेल्या अंडरपास उर्वरित काम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नव्याने तयार करण्यात येत असलेल्या आकुर्ली अंडरपासचे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण आले आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बॅरिकेड्स मंगळवारी रात्री काढून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मंगळवारी मध्यरात्री या मार्गाचे उद्धाटन करण्यात आले.

कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि त्यानंतर या भागात असलेली गॅसची वाहनी यामुळे प्रकल्पाचे काम चांगलेच रखडले होते. केंद्रीय मंत्री आणि खासदार पीयूष गोयल यांनी बैठका घेऊन या अंडरपासचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाने गती पकडली होती. अखेर सर्व अडथळे दूर करून या अंडरपासची पश्चिम द्रुतगती मार्गावरील कामे पूर्ण करण्यात आली. 

पाच टप्प्यांमध्ये उभारणीचे काम

कांदिवली रेल्वेस्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसराला जोडण्यासाठी आकुर्ली अंडरपास महत्त्वपूर्ण आहे. एमएमआरडीएकडून या भागात नवीन अंडरपास उभारण्याचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले होते.  हा अंडरपास ४२ मीटर रुंदीचा आणि ३३.१० मीटर लांबीचा असून, पाच टप्प्यांमध्ये त्याच्या उभारणीचे काम करण्यात आले आहे. मात्र या अंडरपासच्या कामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्ता बॅरिकेडिंग करून निमुळता केल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र होते. त्यातून या पश्चिम द्रुतगती महामार्गावरून गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलपासून ते आकुर्ली सबवेपर्यंत ३.५ किमी अंतराच्या प्रवासासाठी वाहनांना तब्बल एक तास वेळ लागत होता.

Web Title: Western Expressway to ease traffic congestion; Akurli Underpass work completed; Road open to traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई