मुंबई : कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसताना मुंबईच्या सर्वच मार्गांवर वाहनांची गर्दी झाली असल्यामुळे वायुप्रदूषणात भर पडत आहे. सध्या पश्चिम द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाड्यांच्या वर्दळीचा मार्ग असून १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे. परिणामी वायुप्रदूषण वाढत असून, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित मार्ग म्हणून मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गाकडे पाहिले जात आहे.अंधेरी ते दहिसर भागात राहणाऱ्या नागरिकांना या वाढलेल्या वाहतूक कोंडीचा तसेच बदलत्या हवामानाचा त्रास जाणवू लागल्यामुळे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडत आहे. याविषयी अधिक माहिती देताना फुप्फुस विकारतज्ज्ञ डॉ. जिग्नेश पटेल म्हणाले, वायुप्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुप्फुसाचे आजार बळावत असल्याचेही प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो.
वाहतूक कोंडीने वायुप्रदूषणबोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीसारख्या मोठ्या हरित पट्ट्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.मैदानांची कमी झालेली संख्या आणि वाढत्या क्राँकीटीकरणाने हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे. बोरीवली ते वांद्रेपर्यंत जाणारे एस. व्ही. रोड, लिंक रोडवर प्रचंड वाहतुकीमुळे वायू प्रदूषणाची समस्या जास्त आहे.पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूक कोंडीने वायूप्रदूषणाची समस्या चिंतेची ठरली आहे.२४ तास वाहतूक सुरू असल्याने वायूप्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे. त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास वाढतो. प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते.