पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित; 100 कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:14 AM2019-12-13T03:14:44+5:302019-12-13T06:13:23+5:30

प्रवास होणार सुलभ, सल्लागाराची नेमणूक

Western Highway will be signalless; One hundred crores expense | पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित; 100 कोटींचा खर्च

पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित; 100 कोटींचा खर्च

googlenewsNext

मुंबई : एमएमआरडीएतर्फे पश्चिम द्रुतगती महामार्गाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. या मार्गावर पुलांच्या खाली काही ठिकाणी सिग्नल असल्याने प्रवास करण्यास खूप वेळ लागतो. यामुळे हा मार्ग सिग्नलविरहित करण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावर प्रवास जलद होणार आहे. वांद्रे ते बोरीवली अशा चार लेनची वाहतूक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी या मार्गावर विविध कामे करण्यात येणार आहेत़ त्याचा अंदाजित खर्च शंभर कोटी रुपये असणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागार लवकरच सविस्तर प्रकल्प अहवालही एमएमआरडीएला सादर करणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे ते बोरीवली दरम्यानचा २५ किमीचा पट्टा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गावर वाहन चालकांसाठी सुस्पष्ट साइन बोर्ड, जंक्शन डिझाइन, उड्डाणपुलावर सहजपणे प्रवेश आणि बाहेर पडता येण्यासाठी मार्गिका, लेन मार्किंग अशा बाबींची आवश्यकता आहे. येथील चारही लेनची मार्गिका सुधारण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यता आले आहे.

या कामासाठी एमएमआरडीएने जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक केली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि उत्तम कशी होईल, वाहतूककोंडी कशी टाळता येईल याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग ११ लाख चौरस मीटर क्षेत्रावर असून ५.८ लाख चौरस मीटर भागासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर, ४.८ लाख चौ.मी.वर होणाऱ्या कामाच्या निविदा एका आठवड्यात काढण्यात येणार आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची आवश्यकता आहे.

याशिवाय खेरवाडी जंक्शनवर असणाºया नाल्याचे परीक्षण एमएमआरडीए करणार असून नाल्याची ड्रेनेज क्षमता वाढवण्यात येणार आहे. येथील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. या अनुषंगाने काही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

ही कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएने मानस आहे

  • पदपथांवर ग्रीन वॉल ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन
  • पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित
  • वांद्रे ते बोरीवली वाहतूक सुधारण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च
  • जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक
  • वाहतूक सुरळीत, वेगवान व सुरक्षित होण्यासाठी सर्वंकष अभ्यास
  • मध्यवर्ती आणि पदपथांवर ग्रीन वॉल आणि फ्लोरिंग लॅण्डस्केपद्वारे सुशोभीकरण
  • रस्त्यावरील दिवेही उच्च दर्जाचे
  • पादचारी पुलाचा वापर करणाºया पादचाऱ्यांना अधिक सुरक्षित प्रवास करता यावा याकडेही लक्ष
  • आकर्षक रंगसजावटीने या भिंती रंगवण्यात येणार
  • प्रसाधनगृहे आणि भविष्याची गरज ओळखून ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनही
  • खेरवाडी जंक्शनवर असणाºया नाल्याचे परीक्षण करून नाल्याची ड्रेनेज क्षमता वाढवण्यात येणार
  • पादचारी पुलाची होणार दुरुस्ती
  • मुख्य रस्ता आणि पदपथांमध्ये अ‍ॅण्टी क्रॅश बॅरियर बसवण्यात येणार
  • सर्व उड्डाणपूल स्वच्छ करून उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटवण्यात येणार

पूर्व दु्रतगती महामार्गावरही उपाययोजना : पश्चिम द्रुतगती महामार्ग हे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिपत्याखाली होते, मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या मार्गाच्या दुुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो-७ मार्गिकेचे काम सुरू असल्याने या मार्गावर अनेकदा वाहतूककोंडी होते. यामुळे या मार्गावर एमएमआरडीएकडून ही उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरही अशीच उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Western Highway will be signalless; One hundred crores expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.