वेस्टर्न लीड...शाहरु खच्या अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान

By admin | Published: December 12, 2014 11:49 PM2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

शाहरु ख खानच्या अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान

Western Lead ... The unauthorized ramp of Shahrukh Khan is pleasant | वेस्टर्न लीड...शाहरु खच्या अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान

वेस्टर्न लीड...शाहरु खच्या अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान

Next
हरु ख खानच्या अनधिकृत रॅम्पवर पालिका मेहरबान
प्रभाग समितीची बैठक तहकूब

मनोहर कुंभेजकर / वांद्रे
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या वांद्रे पश्चिमेतील बॅन्ड स्टॅन्ड येथील मन्नत बंगल्याबाहेरील ३०० वर्षांपूर्वीचा रस्ता अरुंद करत २००६ साली अलिशान कार ठेवण्यासाठी अनधिकृत रॅम्प बांधला होता. त्यामुळे हा पूर्वी ९.३ मीटर असलेला हा रस्ता ६ मीटर अरु ंद झाला आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे वारंवार तक्र ार करून सुद्धा पालिका प्रशासनाने या अनधिकृत रॅम्पवर कारवाई केली नसल्याने आज वांद्रे (प) येथील एच प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
काँंग्रेसचे नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी याप्रकरणी आज सकाळी प्रभाग समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. चार महिन्यांपूर्वी देखील प्रभाग समितीच्या बैठकीत त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र पालिका प्रशासनाने यावर कारवाई न केल्यामुळे मिरांडा यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. शारु खखानवर मेहरबान असलेल्या पालिका प्रशासनाच्या या गलथान कारभाराबद्दल निषेध करत या प्रभागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभाग समितीची बैठक तहकूब केली.
या संदर्भात वॉचडॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा आणि ग्रॉडफे पिमेटा यांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील याप्रकणी पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी करून सुद्धा शाहरु खच्या अनधिकृत बांधकामावर अजूनही कारवाई झाली नसल्याचे निकोलस अल्मेडा यांनी सांगितले. एच विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त विजय कांबळे यांच्या जनता दरबारात निकोलस अल्मेडा यांनी या बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
या विरोधात त्यांनी वांद्रे(पूर्व)येथील मेट्रोपॉलिटीयन मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्र ार केली असून या महिन्यात यावर सुनावणी होणार आहे. शाहरु ख खान, पालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि तीन पालिका अधिकार्‍यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. पालिका प्रशासन शाहरु ख खानवर मेहेरबान झाले असून त्याच्या बंगल्याला पालिकेने ओसी दिली आहे का? असा सवालही एच प्रभाग समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. यंदा पालिकेने हा रस्ताच बांद्रा फेयर पॉलिसीची 222.द्वष्द्दद्व.द्दश1.द्बठ्ठ या वेबसाइटमधून वगळ्यामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये पालिकेच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

Web Title: Western Lead ... The unauthorized ramp of Shahrukh Khan is pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.